नवी दिल्ली : वृत्तसंस्था – महिला आयोगाने पुन्हा एकदा दिल्ली पोलिसांकडे धाव घेतली आहे. यावेळी प्रकरण एका मोबाईल अॅपचं आहे. महिला आयोगाच्या मते लोकेंटो नावाचं अॅप वेश्यावृत्तीला प्रोत्साहन देत आहे. हे अॅप बंद करण्यासाठी दिल्ली पोलीस आणि दूरसंचार मंत्रालयाला नोटीस जारी करण्यात आली आहे. महिला आयोगाने नोटीशीत म्हटलं आहे की, लोकेंटोसारखं अॅप तात्काळ बंद करायला हवं. कारण याचा समाजावर वाईट परिणाम होत आहे. आयोगाने या प्रकरणी पोलिसांना एफआयआर दाखल करण्यासाठीही सांगितलं आहे.
धड़ल्ले से चल रहा फोन एप्प के ज़रिए जिस्म व्यापार! ये धंधा सिर्फ़ GB रोड नही बल्कि सीधे फ़ोन से चलता है।
"Locanto" नाम की एप पर छोटी लड़कियां बेची जा रही हैं, मानो ऑनलाइन शॉपिंग हो वैश्यवृति के लिए।
पुलिस & दूरसंचार मंत्रालय को नोटिस किया है FIR और एप्प तुरंत बैन करने के लिए। pic.twitter.com/dsSnliz2S7
— Swati Maliwal (@SwatiJaiHind) August 30, 2019
महिला आयोगाने स्वत: केला हस्तक्षेप
दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी स्वत: हस्तक्षेप करत आरोप केला आहे की, हे अॅप खुलेआम वेश्यावृत्तीला प्रोत्साहन देत आहे. नोटीसमध्ये नमूद केले आहे की, हे अॅप गुगल प्ले स्टोर आणि अॅप्पल स्टोरवर उपलब्ध आहे. या अॅपमधून एस्कॉर्ट सर्व्हिसेस, स्ट्रीपर्स, कॉल गर्ल्स इत्यादी सेवा देण्यासाठी खुल्लमखुल्ला जाहिरात केली जात आहे.
अटक करण्याची मागणी
नोटीशीत महिला आयोगाने दिल्ली पोलिसांकडे मागणी केली आहे की, या प्रकरणी तात्काळ एफआयआर दाखल केली जावी. तपासाचा रिपोर्ट तयार करून आरोपींना अटक केल्याची माहिती दिली जावी. इतकेच नाही तर, आयोगाने हेही विचारलं आहे की, असे इतरही मोबाईल अॅप्स किंवा वेब अॅप्लिकेशन्सची ओळख पटली आहे का ? जर पटली असेल तर त्यांच्या विरोधात काय कारवाई करण्यात आली आहे. स्वाती मालीवाल यांनी दूरसंचार मंत्रालयाकडे त्वरीत हे अॅप ब्लॉक करण्यासाठी आणि अन्य अशा अॅप्सवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
- आरोग्यविषयक वृत्त –
- घाम जास्त येत असेल, तर आवश्य करून बघा ‘हे’ खास १३ उपाय
- पिस्ता खाल्ल्याने स्किन कँसरपासून होतो बचाव, जाणून घ्या असेच ६ फायदे
- सावधान ! चुकीच्या मालिशमुळे जाऊ शकतो जीव, लक्षात ठेवा ‘या’ ५ गोष्टी
- डोळ्यांची ‘ही’ समस्या झाल्यास करा ‘हे’ ८ घरगुती उपाय
- पुरुषांमधील ‘ब्रेस्ट कँसर’चे ६ मोठे संकेत, चुकूनही करू नका दुर्लक्ष
- ‘बेकिंग सोड्या’ने वाढवा सौंदर्य ! जाणून घ्या याचे १० अमेझिंग उपयोग
- ‘जापनीज वॉटर थेरेपी’ने वेगाने कमी होते वजन, फक्त असे प्यावे पाणी