बहुजननामा : ऑनलाइन – ग्राहकांना आपल्या आवडत्या वाहिन्यांसाठी निवडण्याची तसेच वाहिन्यांसाठी द्यावे लागणारे बिल ग्राहकांना नियंत्रणासाठी टेलिकॉम रेग्युलेटरी अॅथॉरिटी ऑफ इंडियाने (ट्राय ) नवीन नियमांची अंमलबजावणी केली होती. मात्र यातून नक्की कोणत्या ग्राहकांचे आणि कशा पद्धतीने हित साधले गेले ह्या प्रश्नाचे उत्तर मिळालेले नाही. कारण नव्या नियमावलीच्या अंबालबजावणीनंतर सर्वसामान्य व मध्यमवर्गीय कुटुंबांवर केबलच्या अतिरिक्त शुल्काचा भार पडला आहे. याच संदर्भात ग्राहकांमध्ये संशय असतानाच आता ट्राय आणखी काही नवे नियम लागू करण्याच्या विचारात आहे.
दहा दिवसांपूर्वी ‘ट्राय’ने आपल्या वेबपोर्टलवरून सर्व ब्रॉडकास्टिंग कंपन्या, केबल चालक, डीटीएच कंपन्या तसेच ग्राहकांकडून केबल आणि ब्रॉडकास्टिंगद्वारे आकारल्या जाणाऱ्या शुल्कांसंदर्भात हरकती व सूचना मागवल्या आहेत. केबल टीव्ही प्रसारणासंदर्भात फेब्रुवारीपासून लागू करण्यात आलेल्या नियमावलीत सुधारणा करण्यासाठी याची मागणी करण्यात आली आहे.
ट्रायने फेब्रुवारी २०१९ रोजी धोरण लागू केले होते , ज्याद्वारे ग्राहकांना त्यांच्या आवडीच्या वाहिन्या निवडण्याचे स्वातंत्र्य देताना तेवढय़ाच वाहिन्यांसाठी शुल्क भरण्याची मुभा मिळाली होती. सुरुवातीच्या शंभर वाहिन्यांसाठी ठरावीक शुल्क आणि त्यापुढच्या प्रत्येक २०- २५ वाहिन्यांवर अतिरिक्त शुल्क लागू करण्यात आला. ज्यामुळे ग्राहकांना आपल्याला हव्या त्याच वाहिन्या निवडण्याचे स्वातंत्र्य लाभेल व त्यांचे केबलचे बिल कमी होईल, असा ट्रायचा दावा होता.
मात्र झाले काही उलटेच , ग्राहकांचे केबल बिल स्वस्त होण्याऐवजी महाग झाले. वाहिन्या चालवणाऱ्या कंपन्यांनी सर्व वाहिन्यांचे संच बनवून त्या आकर्षक दरांत उपलब्ध करून दिले.ज्यात कंपन्यांच्या चार लोकप्रिय वाहिन्या आणि सोबत बाकीच्या दहा न पाहिल्या जाणाऱ्या वाहिन्या सामील केल्या. ग्रजकानी हे संच परवडत असल्याने त्याला पसंती दर्शवली. परंतु कंपन्यांच्या या क्लृप्तीमुळे ग्राहकांना जास्त पैसे मोजावे लागत आहेत. ज्याद्वारे प्रत्येक वाहिनीला जास्त प्रेक्षकसंख्या असल्याचे दाखवून जाहिरातीतही पैसे कमावत आहेत. कंपन्यांकडून सवलतींच्या दरात संच जाहीर करण्यालाही ट्रायचा आक्षेप आहे.त्यामुळे ट्रायने खरंच याची गरज आहे का, हा प्रश्न विचारून कंपन्यांना सूचना मागवल्या आहेत. तसेच ट्रायने वाहिन्यांची ही शुल्क पातळी कमी करण्यासंदर्भातही सध्या सूचना मागवल्या आहेत. ट्रायच्या या भूमिकेला व हस्तक्षेपाला ब्रॉडकास्टिंग कंपन्यांचा विरोध आहे.
- आरोग्यविषयक वृत्त –
- घाम जास्त येत असेल, तर आवश्य करून बघा ‘हे’ खास १३ उपाय
- पिस्ता खाल्ल्याने स्किन कँसरपासून होतो बचाव, जाणून घ्या असेच ६ फायदे
- सावधान ! चुकीच्या मालिशमुळे जाऊ शकतो जीव, लक्षात ठेवा ‘या’ ५ गोष्टी
- डोळ्यांची ‘ही’ समस्या झाल्यास करा ‘हे’ ८ घरगुती उपाय
- पुरुषांमधील ‘ब्रेस्ट कँसर’चे ६ मोठे संकेत, चुकूनही करू नका दुर्लक्ष
- ‘बेकिंग सोड्या’ने वाढवा सौंदर्य ! जाणून घ्या याचे १० अमेझिंग उपयोग
- ‘जापनीज वॉटर थेरेपी’ने वेगाने कमी होते वजन, फक्त असे प्यावे पाणी