बहुजननामा : चीनच्या ८० वर्षांचा माजी सैनिक मध्यप्रदेश मध्ये येऊन आपल्या मुलांना भेटण्यासाठी उतावीळ आहे. दरम्यान ८० वंशीय वांगला मध्य प्रदेशातील बालाघाट येथे राहणाऱ्या आपल्या मुलांना आणि नातवंडांना भेटण्यासाठी इच्छा आहे. परंतु त्याच्या व्हिसाचे नूतनीकरण न झाल्याने त्याच्या भेटीत अडथळा येत आहे.
स्वातंत्र्यानंतर १९६३ मध्ये , भारतात हेरगिरीच्या आरोपाखाली वांग ची यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना ७ वर्षे तुरुंगात पाठविण्यात आल्यानंतर १९६९ मध्ये त्यांची सुटका झाली. त्यानंतर पोलिसांनी त्यांना मध्य प्रदेशातील बालाघाट येथील तिरोडा येथील खेड्यात राहण्यासाठी पाठविले. त्यानंतर सुशीला नावाच्या महिलेशी त्यांचा विवाह केले व त्यांना तीन मुले झाली. मध्यप्रदेशात स्थायिक झाल्यानंतर त्यांना चीन मध्ये आपल्या भावंडांना भेटण्याची ओढ लागली. २०१७ मध्ये त्यांना चीनमध्ये जाण्यासाठी व्हिसा उपलब्ध झाला.
वांग ची यांचा मुलगा विष्णू भांग हा बालाघाटमध्ये अकाउंटंट म्ह्णून काम करत आहे. त्यांनी सांगितले , वांग ची यांचा व्हिसा मार्च २०१८ मध्ये रिन्यू करण्यात आला होता. ज्याची मुदत मार्च २०१९ मध्ये संपली. त्यामुळे मार्च २०१९ मध्ये त्यांचा व्हिसाचे नूतनीकरण करायचे होते. पण अद्यापपर्यंत ते काम झालेले नाही. म्हणून वांग याना चीनहून भारतात परत येऊ शकत नाहीयेत. त्यामुळे विष्णू याना भीती आहे कि, नूतनीकरणाचे काम झाले नाही तर तर आपल्या वडिलांना भेटू शकणार नाही.
- आरोग्यविषयक वृत्त –
- घाम जास्त येत असेल, तर आवश्य करून बघा ‘हे’ खास १३ उपाय
- पिस्ता खाल्ल्याने स्किन कँसरपासून होतो बचाव, जाणून घ्या असेच ६ फायदे
- सावधान ! चुकीच्या मालिशमुळे जाऊ शकतो जीव, लक्षात ठेवा ‘या’ ५ गोष्टी
- डोळ्यांची ‘ही’ समस्या झाल्यास करा ‘हे’ ८ घरगुती उपाय
- पुरुषांमधील ‘ब्रेस्ट कँसर’चे ६ मोठे संकेत, चुकूनही करू नका दुर्लक्ष
- ‘बेकिंग सोड्या’ने वाढवा सौंदर्य ! जाणून घ्या याचे १० अमेझिंग उपयोग
- ‘जापनीज वॉटर थेरेपी’ने वेगाने कमी होते वजन, फक्त असे प्यावे पाणी