मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – पाकिस्तानचे माजी उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी काश्मीर मुद्यावर ट्विट करुन पुन्हा स्वत:ची खिल्ली उडवून घेतली. एएनआयच्या म्हणण्यानुसार, बासित यांनी एक ट्विट रिट्वीट केले ज्यात एका पॉर्न स्टारला काश्मिरी तरुण म्हणून वर्णन केले आहे. ट्वीटमध्ये असे लिहिले होते की काश्मिरी तरुण पेलेट गनने जखमी झाला आहे.
बासित यांनी ज्या ट्विटला रिट्विट केले होते. त्याला अमर नावाच्या सोशल मीडिया यूजरने ट्विट केले होते. अमरने अडल्ट स्टारचा फोटो शेयर करत लिहिले की, ‘ये अनंतनाग के रहने वाले यूसुफ हैं. पैलेट गन की वजह से इनकी आंखों की रोशनी चली गई है. कृपया आवाज उठाएं.’
पाकिस्तानी पत्रकार नायला इनायतने एक स्क्रीनशॉट शेअर करुन अब्दुल बासितची चूक स्पष्ट केली. नायला यांनी लिहिले की, माजी उच्चायुक्तने जॉनी सीन्स (अॅडल्ट स्टार) ला काश्मिरी तरुण समजले. नंतर बासित यांनी हे ट्विट डिलीट केले. हे प्रथमच नाही जेव्हा पाकिस्तानी अधिकारी किंवा नेत्यांनी काश्मीरबद्दल चुकीची माहिती शेयर केली असेल.