पठाणकोट बहुजननामा : हवाई दल प्रमुख बी.एस.धानोआ यांनी सोमवारी हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्यासोबत सोमवारी मिग २१ जेट विमानातून उड्डाण केले. त्यावेळी त्यांनी आपल्या भावना व्यक्त करत सांगितले की, ‘आम्ही दोघांनीही पाकिस्तानविरुद्ध लढाई लढली आणि दोघांनीही विमानातून बाहेर उडी घेतली. फक्त साम्य एवढं कि, मी कारगिल युद्धात पाकिस्तानविरुद्ध लढलो आणि अभिनंदन वर्धमान बालाकोटमध्ये लढले. अभिनंदन यांच्या वडिलांबरोबरही मी उड्डाण केले असून आम्ही दोघेही मिग-२१ चे स्वाक्ड्रन होतो. म्हणून त्यांच्या मुलाबरोबर, अभिनंदनबरोबर उड्डाण करणे हा मी माझा सन्मान समजतो.’
बी.एस.धनोआ हे येत्या ३० रोजी निवृत्त होणार आहेत. त्यानिमित्त सोमवारी धनोआ यांनी अभिनंदन यांच्यासह सकाळी साडेअकराच्या सुमारास मिग २१ जेट विमानातून उड्डाण केले त्यानंतर धनोआ यांनी पत्रकारांशी संवाद साधला. सहा महिन्यांपूर्वी बालाकोट येथे पाकिस्तानी विमानांचा पाठलाग करताना अभिनंदन हे चुकून पाकिस्तानी हद्दीत गेले होते त्यानंतर त्यांना पाकिस्तानी लष्कराने आपल्या ताब्यात घेतले होते. परंतु त्यानंतर पाकिस्तानने त्यांची कोणतीही अट न करता सुटका केली होती. अभिनंदन यांना विमान उड्डाण करण्याबाबत बेंगळुरू येथील भारतीय हवाई दलाच्या इन्स्टिट्यूट ऑफ एअरोस्पेसच्या अधिकाऱ्यांनी सकारात्मक अहवाल दिला होता. त्यानंतर अभिनंदन यांचा सराव सुरू होता. सोमवारी जवळपास दोन आठवड्यांनी अभिनंदन आकाशात झेपावले. जवळपास तीस मिनिटे हवाईदल प्रमुख धनोआ यांच्यासोबत अभिनंदन आकाशात होते.
धनोआ म्हणाले कि, ‘माझ्यात आणि अभिनंदनमध्ये एक साम्य आहे. आम्ही दोघेही पाकिस्तानविरुद्ध लढलो, आणि दोघांनीही विमानातून उडी घेतली. पण मी कारगिल युद्धात लढलो आणि अभिनंदनने बालाकोटनंतर झालेल्या पाकिस्तानविरुद्ध संघर्षात भाग घेतला. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, मी अभिनंदन यांचे वडील सिंहकुट्टी वर्धमान यांच्याबरोबरही मी उड्डाण केले. आज मी हवाई दलाच्या लढाऊ विमानातून शेवटचे उड्डाण केले. या उड्डाणात त्यांचा मुलगा, अभिनंदन माझ्या बरोबर होता. हि माझ्या साठी सन्मानाची बाब आहे. मी १९८८ मध्ये विमानातून उडी घेतली त्यानंतर मला परत कर्तव्यावर येण्यास नऊ महिने लागले. त्याचप्रमाणे अभिनंदननेही विमानातून उडी घेतल्यानंतर त्याला परत कर्तव्यावर येण्यास सहा महिने लागले. त्याच्यासाठी ही चांगली बाब आहे. सध्या तो प्रशिक्षणार्थी कॅप्टन आहे आणि त्याची उड्डाण करण्याची पात्रता त्याने परत मिळवली आहे.’