पिंपरी : बहुजननामा ऑनलाईन – चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीतून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पतीने त्याच्या वडिलांसाठीच पत्नीशी लग्न केलं असा धक्दायक खुलासा केला आहे. पती कामावर गेल्यानंतर सासरा सतत लगट करत असे म्हणून पत्नीने पतीकडे तक्रार केली असता वडिलांसाठीच तुझ्याशी लग्न केलं आहे असे धक्कदायक उत्तर पतीने दिले. शिवाय तिला त्यांच्या इच्छेप्रमाणे वागण्यास सांगितले. इतकेच नाही तर भांडण काढून तिला माहेरी पाठवत घटस्फोटाची नोटीसही बजावली.
36 वर्षीय महिलेने या प्रकरणी फिर्याद दिल्यानंतर 40 वर्षीय पती आणि 65 वर्षीय सासऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 20 मे 2018 ते 16 सप्टेंबर 2018 या कालावधीत ही घटना चिखलीतील सानेवाडी परिसरात घडली.
फिर्यादी महिला सासरी नांदत असताना आरोपींनी आपापसात संगनमत करून माहेरहून पैसे आणावेत यासाठी तिचा शारीरिक आणि मानसिक छळ केला. फिर्यादीचा पती कामावर गेल्यानंतर काही ना काही कारणाने सासरे फिर्यादीशी लगट करत असे. या प्रकरणाचा अधिक तपास चिखली पोलीस करत आहेत.