नवी दिल्ली : वृत्तसंस्था – INX मीडिया प्रकरणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी चिंदबरम यांना सीबीआयकडून 30 तासांनंतर अटक करण्यात आली आहे. काल पासून(मंगळवार दि 20 ऑगस्ट) गायब असलेले पी चिदंबरम आज(दि 21 ऑगस्ट) अचानक काँग्रेस कार्यालयात हजर झाले होते. त्यांनी माध्यमांशी संपर्क साधत आपण निर्दोष असल्याचे सांगितले होते. त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर सीबीआय पथक लगेचच त्यांच्या घराकडे रवाना झाले होते.
आज सकाळीच सीबीआय पथक चिदंबरम यांना ताब्यात घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी पोचलं होतं परंतु ते घरात सापडले नाही त्यामुळे सीबीआयच्या हाती निराशा आली होती. पी चिदंबरम यांच्या अटकपूर्व जामीनावर शुक्रवारी सुनावणी होणार आहे. त्यामुळे त्यांच्या अटकेची शक्यता वाढली होती. दरम्यान त्यांची सुनावणी कोणत्या खंडपीठासमोर होणार आहे हे अद्याप ठरलेले नसून याचा निर्णय गुरुवारी संध्याकाळपर्यंत घेतला जाणार आहे.
आएनएक्स मीडिया घोटाळ्या प्रकरणी पी चिदंबरम यांच्या विरोधात ईडीने आर्थिक घोटाळ्या प्रकरणी तर सीबीआयने भ्रष्टाचारप्रकरणी एफआयआर दाखल केली आहे. दरम्यान पी चिदंबरम देश सोडून जाऊ नयेत यासाठी ईडीनंतर आता सीबीआयनेदेखील लुकआउट नोटीस जारी केली होती.
#WATCH A team of Enforcement Directorate arrives at the residence of Congress leader P Chidambaram at Jor Bagh in Delhi. pic.twitter.com/Wew3FrNGcg
— ANI (@ANI) August 21, 2019
Delhi: Police and ED team outside the residence of Congress leader P Chidambaram at Jor Bagh in Delhi. pic.twitter.com/lCWIQcAw0Y
— ANI (@ANI) August 21, 2019
Delhi: ED team enters the residence of P Chidambaram. pic.twitter.com/P1ZXC5MpIY
— ANI (@ANI) August 21, 2019
Delhi: P Chidambaram taken away in a car by probe agency officials. pic.twitter.com/g6LgcfDyMj
— ANI (@ANI) August 21, 2019