बहुजननामा ऑनलाईन – यूएस ओपनच्या तयारीसाठी टोरोंटो येथे सुरु असलेल्या रॉजर्स चषकात सामन्यात सेरेना विल्यम्सला निराशा पत्करावी लागली. रॉजर्स कपच्या अंतिम सामन्यात सेरेनाला कॅनडाच्या बियान्का अँड्रेस्कूविरुद्धच्या पहिल्या सेटदरम्यान निवृत्ती घ्यावी लागली होती. पाठदुखीच्या समस्येमुळे तिला या सामन्यातून माघार घ्यावी लागली. यावेळी सेरेना वेदनामुळे अक्षरशः रडत होती.
दरम्यान सेरेना विल्यम्स आणि कॅनडाच्या बियान्का अँड्रेस्कू यांच्यात रॉजर्स कपचा अंतिम सामना सुरु होता. तेव्हा बियान्का आणि सेरेना यांच्या गुणफलक ३-१ असा होता. बियान्का सेरेनापेक्षा २ गुणांनी आघाडीवर होती. तेव्हा सेरेनाही चांगल्या खेळाचे प्रदर्शन करताना दिसली. मात्र त्यानंतर सेरेनाला पाठदुखीचा त्रास जाणवू लागल्याने ती अचानक रडू लागली. आणि तिने सामना सुरु असतानाच निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला.
ती जो सामना खेळली त्याच्यावर तिने सामन्यानंतर स्पष्टीकरणही दिले. ती म्हणाली की, मला क्षमा करा की मला काहीही करता आले नाही. मी खूप प्रयत्न केले पण मी माझा खेळ सुरु ठेवू शकले नाही. हे सांगताना तिच्या डोळ्यांत अश्रू होते. तसंच हे वर्ष खूप कठीण होते, परंतु मी प्रयत्न करत राहणार आहे, असंही तिने यावेळी सांगितलं. सेरेना ही ३७ वर्षांची असून यापूर्वी ती आपल्या गुडघ्याच्या दुखापतीमुळे खेळापासून दूर राहिली होती. त्यातून बाहेर आल्यानंतर या स्पर्धेसाठी स्वत: ला फिट घोषित केले. मात्र अंतिम सामन्यात तिने माघार घेतली. दरम्यान, सेरेनाने माघार घेतल्यामुळे रॉर्जर कप विजेती म्हणून बियान्काला घोषित करण्यात आले. त्यामुळे कॅनडामधून रॉर्जर कप जिंकणारी बियान्का अँड्रेस्कु ही पहिली महिला ठरली आहे.