नाशिक बहुजननामा : आई – वडील झोपले असताना अवघ्या ११ महिन्याच्या चिमुरड्याचा बादलीत पडून मृत्यू झाल्याची दुःखद घटना नाशिक मध्ये घडली. तन्मय दीपक भोये असे या बालकाचे नाव आहे. तन्मय हा दुपारी (११ ऑगस्ट) खेळता खेळता बादलीत पडला नाका तोंडात पाणी गेल्याने त्याचा गुदमरून मृत्यू झाला , हि घटना पंचवटी भागातील दळवी चाळ येथे झाली.
भोये यांचे कुटुंब दुपारी १२ च्या सुमारास घरात झोपले होते , त्यावेळी खेळता खेळता तन्मय बाथरूमजवळ गेला. बाथरूमजवळ पाण्याने भरलेल्या बादलीत डोकावताना त्याचा तोल गेला असावा. त्याचे डोके खाली बादलीत आणि पाय वर अश्या अवस्थेत आसल्याने त्याच्या नाका तोंडात पाणी गेले, त्यामुळे त्याला श्वास घेता आला नाही , त्यातच त्याचा गुदमरून मृत्यू झाला.
तन्मय पाण्यात पडल्याचे बघताच कुटुंबीयांनी त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेले , परंतु त्याच्या मृत्यू झालेला होता. या घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. पंचवटी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.