यवतमाळ : बहुजननामा ऑनलाईन – महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या वतीने ‘धम्मक्रांती प्रज्ञापर्व २०१९’चे आयोजन ७ ते १४ एप्रिल दरम्यान पुसद येथे करण्यात आले. या आयोजना संदर्भात चर्चा करण्यासाठी बैठक पार पडली. यावेळी धम्मक्रांती प्रज्ञापर्व समिती गठित करण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी भीमराव कांबळे होते. प्रमुख अतिथी म्हणून बाळासाहेब वाठोरे, महेश खडसे, सूरज वरठी, नारायण ढोके, बाबाराव उबाळे होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला तथागत भगवान गौतम बुद्घ व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रज्ञापर्व आयोजन समितीच्या अध्यक्षपदी सुखदेव भगत यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. कार्याध्यक्ष विठ्ठल खडसे, उपाध्यक्ष गणेश वाठोरे, नरेंद्र पाटील, सचिव साहेबराव गुजर, सहसचिव राजेश ढोले, कोषाध्यक्ष बाळासाहेब कांबळे, सहकोषाध्यक्ष दीपक भवरे, निमंत्रक भगवान हनवते, संघटक प्रशांत धुळे व इतर सदस्य यांची निवड करण्यात आली. तसेच धम्मक्रांती प्रज्ञापर्व कार्यालय बसस्टॅँड जवळील अग्रवाल कॉम्प्लेक्समध्ये उद्घाटन करण्यात आले. धम्मक्रांती प्रज्ञापर्वाचे आयोजन ७ ते १४ एप्रिल या कालावधीत केले असून, प्रबोधनात्मक कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन धम्मक्रांती प्रज्ञापर्व समितीच्या वतीने करण्यात आले आहे.