नवी दिल्ली : बहुजननामा ऑनलाईन – आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाची (बसप) आघाडी झालेली आहे.कोणत्याही परिस्थितीत भाजपला कसे रोखता येईल याची रणनीती या दोन्ही पक्षांनी केली आहे. आज आणखी एक उमेदवारांची यादी सपा-बसपाने जाहीर केली आहे.
समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी आझमगड या लोकसभा मतदारसंघातून निवडणुक लढणार असल्याचे जाहीर केले आहे. तसेच पक्षाचे नेते आझम खान हे सुद्धा उत्तरप्रदेशातील रामपूर लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवणार आहेत.समाजवादी पक्षाने आज आणखी एक उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये एटा लोकसभा मतदार संघातून देवेंद्र यादव. पीलीभीत लोकसभा मतदार संघातून हेमराज वर्मा आणि फैजाबाद लोकसभा मतदार संघातून आनंद सेन यांच्या नावाची घोषणा समाजवादी पक्षाकडून करण्यात आली आहे.