मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – गेल्या काही दिवसापासून सोलापूर विद्यापीठाला राजमाता अहिल्यादेवी होळकर नाव देण्याच्या मागणीने राज्यभरात जोर धरला असताना. आता त्यांची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होत आली असून येत्या मंत्रिमंडळ बैठकीत यावर शिक्कामोर्तब होऊन निर्णय होणार झाल्याचे संगणयत आले आहे . त्यानंतर लवकरच राज्यातील मृद व जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे हे सोलापूर येथे जाऊन विद्यापीठाचे नामकरण करणार असल्याचेही राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
भाजपा सरकार सतेत आल्यानंतर शिक्षकमंत्री विनोद तावडे यांनी नुकतीच सोलापूर विद्यापीठाच्या नामांतराची घोषणा केली होती. अहिल्यादेवी होळकर यांचे विद्यपीठाला नाव दयावे अशी मागणी धनगर समाजाची होती. परंतु त्याला शिवा-अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेसह अनेक संघटनांनी विरोध करत शिवयोगी सिद्धेश्वर हे सोलापूरचे ग्रामदैवत असल्याने सिद्धेश्वरांचे नाव या विद्यापीठाला द्यावे. अशी मागणी लिंगायत समाजाची केली होती. विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने १९ डिसेंबर २०१७ रोजी तातडीची बैठक घेऊन विद्यापीठाला अहिल्याबाईंचे नाव देण्याचा निर्णय घेतला. त्यावर त्यांनी न्यायालयात धाव घेतल्याचेमुळे हा प्रश्न प्रलंबित होता.
खरे तर मंत्रीमंडळ समितीला विद्यापीठ नामांतराबाबत निर्णय घेण्याचा अधिकार नसून कायद्याप्रमाणे तो अधिकार विद्यापीठाची सिनेट. व्यवस्थापन परिषद यासारख्या मंचांना आहे. त्यामुळे याप्रश्नी मंत्री समितीची स्थापनाच बेकायदा आहे. असा आरोप मुख्य याचिकेतून करण्यात आला होता. यापूर्वी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने नामांतराचा प्रस्ताव अनेकदा नाकारला