पुणे : बहुजननामा ऑनलाईन – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विधि (लॉ) अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाच्या विषयाच्या प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणी आता चौकशी समिती नेमण्याचा निर्णय विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
विद्यापीठाच्या विधि (लॉ ) अभ्यासक्रमाच्या प्रश्नपत्रिका परीक्षा होण्यापूर्वीच संकेतस्थळावर अपलोड केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. त्यानंतर कुलगुरूंनी सत्यशोधन समिती नेमली होती. या समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर परीक्षा मंडळाची बैठक झाली. त्या घटनेला कोण जबादार आहे. हे कोणी केले आहे त्यावर योग्य ती कारवाही केली जाईल. त्यासाठी विद्यापीठाने सत्यशोधन समिती नेमली आहे.समितीचा अहवाल आल्यानंतर दोषीवर कारवाही केली आहे.
कुलगुरच्या अध्यक्षतेखाली व्यवस्थापन परिषद गठीत केली होती. या परिषद सदस्य राजेश पांडे यांच्या अध्यक्षतेखाली समिती राहील. या समितीत डॉ. सुधाकर जाधवर, डॉ. संजय चाकणे आणि महेश आबाळे यांचा समावेश आहे. या समितीचा अहवाल ८ दिवसात सादर झाल्यानंतर दोषींवर कडक कारवाही केली जाईल सत्यशोधन समितीकडून सांगण्यात आले.