टाकवे बुद्रुक : बहुजननामा ऑनलाईन – पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शोभा सुदाम कदम यांनी अनोखा उपक्रम राबवला आहे .जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण समितीतील २० टक्के निधीतून टाकवे-वडेश्वर गटातील ३३ दलित वस्त्यांमध्ये दरिपंजा (सतरंजी) समाज प्रबोधन साहित्य आणि ३२ वस्त्यांमध्ये दरिपंजा (सतरंजी) वाटप राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे, जिल्हा परिषद सदस्या शोभा कदम व महिला अध्यक्षा सुवर्णा राऊत यांचे हस्ते करण्यात आले.
मावळ पंचायत समितीच्या आवारात झालेल्या या कार्यक्रमास टाकवे बुद्रुक-वडेश्वर गटातील जवळपास ३३ गावातील मागासवर्गीय आणि आदिवासी वस्तीतील ३३ लाभार्थ्यांना सामाजिक प्रबोधन साहित्याचे वाटप केले. या वेळी शोभा कदम म्हणाल्या की, सर्व घटकांना योग्य न्याय देत सर्व समावेशक काम केले जाईल. बबनराव भेगडे म्हणाले की, ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण करत असताना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत जाऊन विकास काम करावे. गावांमध्ये साहित्य वाटप झाल्यामुळे नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
कार्यक्रमावेळी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे, पुणे जिल्हा परिषद सदस्या शोभा कदम, राष्ट्रवादी महिला तालुकाध्यक्षा सुवर्णा राऊत, आदिवासी संघटनेचे अध्यक्ष राघु तळपे, संत तुकाराम सहकारी साखर कारखाना संचालक अंकुश आंबेकर, राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्ष कैलास गायकवाड, संघटनमंत्री नारायण ठाकर, कैलास खांडभोर, माजी सरपंच नामदेव शेलार आणि मागासवर्गीय वस्तीमधील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.