भंडारा : बहुजननामा ऑनलाईन – नवीन टाकळी भगतसिंग वॉर्ड भंडारा येथील महात्मा जोतिबा फुले यांच्या स्मारकाच्या जागेवर करण्यात आलेले अतिक्रमण व अवैध बांधकाम तीन दिवसात हटविण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सामूहिक उपोषण सुरू आहे. भारिप बहुजन महासंघ प्रणित वंचित बहुजन आघाडीच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.
नवीन टाकळी भगतसिंग वॉर्ड भंडारा येथील महात्मा जोतिबा फुले यांच्या स्मारकाच्या जागेवर करण्यात आलेले अतिक्रमण व अवैध बांधकाम तीन दिवसात हटविण्याची मागणी भारिप बहुजन महासंघ आणि अखिल भारतीय माळी महसंघाने जिल्हाधिकारी यांना ५ फेब्रुवारीला जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात केली होती. तसेच कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला होता. परंतु नगरपरिषद व महसूल अधिकाऱ्यांनी आजपर्यंत सदर अतिक्रमण व अवैध बांधकाम काढून टाकण्याची कारवाई केलेली नाही. याविरोधात भारिप बहुजन महासंघ प्रणित वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन केले.
यावेळी महासचिव दीपक गजभिये, शैलेश राहुल, प्रकाश सुखदेवे, संतोष भेदे, सुकराम देशकर, आनंंदराव मेश्राम, आशा शेंडे, सत्यशिला नागदेवे, करुणा फुले, दुर्गा गजभिये, मनसे जिल्हाध्यक्ष नितीन वानखेडे, मनसे जिल्हा सचिव तुर्रम गोन्नाडे, शैलेश गजभियेे, रवींद्र मानकर, सोमेंद्र शहारे, विजय शहारे, महावीर घोडेस्वार, सुरेश बोरकर, ज्ञानदेव टेंभुर्णे, दिवाकर मेश्राम, भारिप उपाध्यक्ष दिगंबर मेश्राम, महादेव सुखदेवे, मोदकराज रामटेके, राजेश मेश्राम, भीमराव बन्सोड, अपर्णा भेदे, इंदू कटनकर, ओबीसी क्रांती मोर्चाचे संजय मते, शिव आजबले यांचा समावेश आहे.