नवी दिल्ली : बहुजननामा ऑनलाइन – आधीच संथावलेल्या अर्थव्यवस्थेवर कोरोना विषाणूजन्य साथीच्या आघातामुळे भारताचे सकल राष्ट्रीय उत्पादन अर्थात जीडीपीचा दर सरलेल्या एप्रिल ते जून तिमाहीत २३.९ टक्क्यांनी घसरल्याचं मागील आठवड्यात जाहीर करण्यात आलं. त्याच पार्श्वभूमीवर अर्थव्यवस्था सावरण्यासाठी केंद्र सरकार सार्वजनिक क्षेत्रातील तब्बल २६ कंपन्यांचं खासगीकरण करणार असल्याचं समोर आलं आहे. त्यावरुन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.
मागील काही दिवसांपासून ‘अर्थव्यवस्था की बात’ यामाध्यमातून राहुल गांधी केंद्र सरकारवर निशाणा साधत आहेत. आता ‘मोदी सरकारचा आणखी एक लज्जास्पद प्रयत्न’ असे म्हणत राहुल गांधी यांनी पंतप्रधानांवर हल्लाबोल केला आहे. राहुल यांनी आपल्या ट्विटर वरुन एक ट्विट करत म्हणतात की “मोदीजी, सरकारी कंपनी विका मोहीम चालवत आहेत. स्वतःच निर्माण केलेल्या आर्थिक अरिष्टाची भरपाई करण्यासाठी देशाची संपत्ती थोडी थोडी करुन विकली जात आहे. जनतेचं भविष्य आणि विश्वास बाजूला ठेवून LIC ला विकणं मोदी सरकारचा आणखी एक लज्जास्पद प्रयत्न आहे” असं ते म्हणाले.
मोदी जी ‘सरकारी कंपनी बेचो’ मुहीम चला रहे हैं।
खुद की बनायी आर्थिक बेहाली की भरपाई के लिए देश की सम्पत्ति को थोड़ा-थोड़ा करके बेचा जा रहा है।
जनता के भविष्य और भरोसे को ताक पे रखकर LIC को बेचना मोदी सरकार का एक और शर्मनाक प्रयास है। pic.twitter.com/W4OjDJ1nY7
— Rahul Gandhi (@RahulGandhi) September 8, 2020
‘मोदी है तो यही मुमकिन है’
‘७० वर्षात के काही उभं केलं होत, ते सगळं हे विकून टाकणार’ असे ट्विट करत काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, “देशाच्या आणखी २६ सरकारी कंपन्या विकल्या जाणार आहेत. ७० वर्षात जे काही उभं केलं होतं, ते सगळं हे विकून टाकणार. मोदीजी काय सांगून सत्तेत आले होते ‘मै देश नही बिकने दूंगा’ त्याचा अर्थ होता देशातील काही विक्री होण्यापासून सोडणार नाही. मोदी है तो यही मुमकिन है” असं सुरजेवाला यांनी म्हटलं आहे.
देश की 26 सरकारी कम्पनी और बेची जाएँगी!
70 साल में जो भी बनाया था ये सब बेच डालेंगे!
और मोदी जी सत्ता में क्या कह कर आए थे….
“मैं देश नही बिकने दूँगा”मतलब था…
‘देश में कुछ भी बिकने से नही बचने दूँगा’मोदी है तो यही मुमकिन है!#StopSellingIndia https://t.co/BsNh2wUm49
— Randeep Singh Surjewala (@rssurjewala) September 7, 2020