नवी दिल्ली :वृत्त संस्था – Note in Well |यूपीच्या (UP) कानपुरमध्ये (Kanpur) एका कोरड्या प्राचीन विहिरीतून 500 आणि 2000 च्या नोटा (Note in Well) निघू लागल्या. ही बातमी वार्यासारखी सर्व पसरली आणि लोकांनी एकच गर्दी करून पैसे लुटण्यास सुरूवात केली. Note in Well | when 500 and 2000 notes started coming out of dry well people broke down to collect money
कानपुरच्या पसेमा(Pasema) गावाबाहेर प्राचीन शिवमंदिर (Ancient Shiva Temple) आहे, मंदिराच्या शेजारीच प्राचीन विहिर असून ती 50 फुट खोल आहे. विहिर कोरडी आहे.
याच विहिरीजवळ मुले खेळत असताना त्यांनी विहिरीत वाकून पाहिले असता त्यांना धक्काच बसला.
यानंतर सर्व मुले जमा झाली विहिरीत (Well) मोठ्या प्रमाणात पाचशे आणि दोन हजारच्या नोटा (Notes) पडल्या होत्या.
यानंतर मुलांनी तेथील काही चिकट फळे धाग्याला बांधून विहिरीत सोडली आणि काही नोटा बाहेर काढल्या.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
नोटा काढण्यासाठी वापरल्या वेगवेगळ्या पद्धती
यानंतर आजूबाजूचे गावकरी सुद्धा जमा झाले, विहिरीजवळ मोठी गर्दी जमा झाली.
प्रत्येकजण नोटा काढण्यासाठी वेगवेगळी युक्ती वापरू लागला.
विहिरीत एक मोबाइल फोन सुद्धा पडला होता.
पसेमा सरपंचांनी (Pasema Sarpanch) सांगितले की, याबाबतची माहिती सायंकाळी उशीरा पोलिसांना देण्यात आली.
असे म्हटले जात आहे की, एखाद्या चोराने चोरीनंतर नको असलेल्या वस्तू या विहिरीत टाकल्या असतील आणि त्या टाकताना मोबाइल आणि पैशांचे बंडल विहिरीत पडले असेल.
या संपूर्ण घटनेवर अद्याप प्रशासनाकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
Web Title : Note in Well | when 500 and 2000 notes started coming out of dry well people broke down to collect money.
Akola Crime | जमिनीच्या वादातून लहान भावाने केली थोरल्या भावाची हत्या
Pimpri Crime | अण्णासाहेब मगर स्टेडियम येथे 12 वर्षाच्या मुलाची आत्महत्या
Pune Crime | पुण्यात पतीचा खून करुन फासावर लटकवले; अंत्यसंस्काराच्यावेळी मुलीनं सर्व काही सांगितलं