पुणे न्यूज : बहुजननामा ऑनलाईन – कोरोनाची (Corona Virus) दुसरी लाट नियंत्रणात येत आहे. दैनंदिन वाढत्या रुग्णाची संख्या आता घटताना दिसत आहे. अशातच आता कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा इशारा देखील तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे. यामुळे राज्यात कोणतेही निर्बंध हटवण्यात आले नाही. अशातच पुण्यात देखील निर्बंध (Pune Lockdown) कायम ठेवण्यात आले आहेत. नव्या आदेशानुसार पुणे पालिकेच्या (Pune Corporation) हद्दीतील नियम कायम ठेवले आहे. पुण्यात तिसऱ्या स्तरातील निर्बंध असून, शनिवार (Saturday) आणि रविवार (Sunday) अत्यावश्यक सेवा सोडून बाकी आस्थापना बंद (Pune Lockdown) राहणार आहेत.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
पुण्यात आहे ते नियम कायम ठेवल्याने, व्यापारी, हॉटेल व्यावसायिक यांना आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. पुणे शहरात पॉझिटिव्हिटी रेट (Positivity rate) 5 टक्क्यांच्या खालीच आहे, परंतु असं असून देखील निर्बंध शिथील करण्यास प्रशासन तयार नाही. दरम्यान आज शुक्रवारी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे आठवडीप्रमाणे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक घेण्यात येणार आहे. पण, पुणे महापालिकेने यापूर्वीच निर्बंध आहे तसे राहतील याबाबत आदेश काढला गेला आहे.
दरम्यान, आजच्या होणाऱ्या बैठकीनंतर निर्बंध शिथील होण्याची शक्यता कमीच आहे. तसेच, पुण्यातील ग्रामीण भागात काही तालुक्यात आठवी ते बारावीचे वर्ग सुरू झाले असले तरी पुणे शहरात सर्व शैक्षणिक संस्था 31 जुलैपर्यंत बंदच राहण्याचे आदेश देखील जारी करण्यात आलं आहे.
पुण्यात काय सुरू काय बंद ?
> पुणे महापालिका क्षेत्रातील सर्व अत्यावश्यक सेवाअंतर्गत दुकाने आठवड्यातील सर्व दिवस दुपारी 4 वाजेपर्यंत सुरु.
> अत्यावश्यक सेवा शिवाय सर्व दुकाने सोमवार ते शुक्रवार 4 वाजेपर्यंत सुरु राहतील तर शनिवार-रविवार पूर्णपणे बंद राहतील.
> मॉल्स, सिनेमागृहं संपूर्ण बंद आहेत.
> रेस्टॉरंट, बार, फुड कोर्ट सोमवार ते शुक्रवार दुपारी 4 वाजेपर्यंत आसन क्षमतेच्या 50 टक्के क्षमतेने आणि शनिवार रविवार फक्त पार्सल सेवा 11 पर्यंत.
> अंत्यसंस्कार, दशक्रिया विधी आणि त्यासंबंधित कार्यक्रमांना 20 लोकांच्या उपस्थितीची परवानगी आहे.
> सर्व धार्मिक स्थळे बंद, धार्मिक स्थळांवर नित्योपचार पूजेला परवानगी.
> कृषी संबंधित दुकाने आस्थापना आठवड्यातील सर्व दिवस दुपारी 4 वाजेपर्यंत.
> उद्याने, मैदाने, जॉगिंग, रनिंग आठवड्यील सर्व दिवस पहाटे पाच ते सकाळी नऊ वाजेपर्यंत.
> खासगी कार्यालयं कामाच्या दिवशी 50 टक्के क्षमतेने दुपारी चार वाजेपर्यंत.
> अत्यावश्यक सेवा बाबत शासकीय कार्यालयं 100 टक्के क्षमतेने.
> लग्नसमारंभाला 50 लोकांच्या उपस्थितीची परवानगी.
Web Title : Pune Lockdown | Pune Corporation extended restrictions weekend lockdown in pmc decided ajit pawar
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Pimpri Crime | अण्णासाहेब मगर स्टेडियम येथे 12 वर्षाच्या मुलाची आत्महत्या
Akola Crime | जमिनीच्या वादातून लहान भावाने केली थोरल्या भावाची हत्या