मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ या पुस्तकावरून देशभरातून तीव्र निषेधाच्या प्रतिक्रिया उमटत असतानाच आता नव्याने भाजप खासदार तेजस्वी सुर्या यांनी अमित शहांना एक पेंटिंग फोटो भेट दिला. हा फोटो सोशल मीडियावर आता चांगलाच व्हायरल होत आहे.
या फोटोमध्ये सरदार वल्लभभाई पटेल आणि अमित शहा यांचा अर्धा अर्धा फोटो एकत्रित पेंटिंग केल्याचे दिसत आहे. ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ या पुस्तकावरून भाजप चांगलेच अडचणीत सापडले असताना आता या सरदार पटेल आणि शहा यांच्या एकत्रित फोटो ने चांगलाच वाद उफाळून आला आहे.
युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांशी पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना करण्याच्या कुटील कारस्थानानंतर आता भारताचे पोलादी पुरुष वल्लभभाई पटेल यांच्याशी अमित शाह यांची तुलना करण्याचे धाडस केवळ अंधभक्तच नाही तर भाजपाच्या अनुनयी खासदारांकडूनही होत आहे. pic.twitter.com/B9PMEwH89V
— NCP (@NCPspeaks) January 19, 2020
यावर राष्ट्रवादी काँग्रेसने टिप्पणी करताना ”युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांशी पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना करण्याच्या कुटील कारस्थानानंतर आता भारताचे पोलादी पुरुष वल्लभभाई पटेल यांच्याशी अमित शहा यांची तुलना करण्याचे धाडस केवळ अंधभक्तच नाही तर भाजपाच्या अनुयायी खासदारांकडूनही होत आहे” म्हटले आहे.राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत फेसबुक पेजवरून फोटो बरोबर ही टिप्पणी करण्यात आली आहे.