उत्तर कोरिया : वृत्तसंस्था – उत्तर कोरिया हे हुकूमशाही देश असल्याने येथे काही ना काही घडतच असते. असाच एक खळबळ जनक प्रकार समोर आला आहे. तेथील अध्यक्ष हुकूमशहा किम जोंग उन यांच्या आदेशावरून त्यांच्या फायरिंग अधिकाऱ्याने साऊथ कोरियन सिनेमा, म्युझिक CD आणि ब्रॉडकास्ट स्टोरी अवैधरित्या विकणाऱ्या व्यक्तीवर ५०० नागरिकांच्या समोर गोळ्या झाडल्या आहेत. ली (Lee) असे त्या व्यक्तीचं नाव आहे.
अधिक माहितीनुसार, ‘ली’ हा वॉनसन फार्मिंग मेनेजमेंट कमीशनमध्ये चीफ इंजिनिअरचं काम करत होता. त्याला साऊथ कोरियन सिनेमा, म्युझिक आणि ब्रॉडकास्ट स्टोरी अवैधरित्या विकत असताना पकडलं. तो त्या CD आणि USB ५ डॉलर ते १२ डॉलरपर्यंत विकत होता. असे लीने कबूल देखील केले होते. मात्र, एप्रिल २०२१ मध्ये ली वर फायरिंग पथकाकडून १२ गोळ्या झाडल्या गेल्या. त्यावेळी लीच्या परिवारासह ५०० जण तेथे उपस्थित होते.
Centre tells Supreme Court that it will take a final decision on the issue of conducting or cancelling class XII CBSE, ICSE Board exam in two days and seeks time till Thursday to place its decision before the court
— ANI (@ANI) May 31, 2021
या दरम्यान, ली ला तेथे लागू असलेल्या प्रतिक्रिया-विरोधी विचार कायदा अंतर्गत ‘समाज-विरोधी घटक कायद्यात दोषी ठरवल्यानंतर त्याला ही शिक्षा दिली गेली. एवढ्या साध्या गुन्ह्यामध्ये इतकी मोठी शिक्षा उत्तर कोरिया राष्ट्रात दिली जाते. तसेच, अशाप्रकारे गैरव्यवहार आणि बेकायदेशीर कृत्य करणं हे त्यांच्यासाठी फायदेशीर ठरतं जे आपल्या समाजाला नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे बेकायदशीर काम करणाऱ्या कोणालाही न घाबरता जगण्याची परवानगी देऊ नये. असे तेथील अधिकाऱ्याने म्हटले आहे. दरम्यान, ली याला गोळ्या झाडल्यानंतर त्यांचा मृतदेह एका पेटीत बंद करून घेऊन गेले. हे पाहून त्याची पत्नी, मुलगा आणि मुलगी जागेवरच चक्कर येऊन पडले. त्यानंतर राज्य सुरक्षा मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना उठवलं आणि देशाची कैदी म्हणून कोठडीत पाठवलं गेलं. ली’ च्या पत्नीला अधिकाऱ्यांनी एका तुकड्याप्रमाणे उचललं आणि ट्रकमध्ये टाकलं, मात्र, दहशतीमुळे कोणीच काही बोलू शकलं नाही असं सूत्रांकडून सांगण्यात आलं आहे.
CBSE, ICSE बोर्डाच्या 12 वी च्या परीक्षा होणार की नाही ?, विद्यार्थ्यांचे भवितव्य अद्याप अनिश्चित
इंडियन आयडॉलमध्ये आणखी एक ‘प्रेमकथा’? सायली कांबळे म्हणाली – ‘माझं त्याच्यावर प्रेम’
मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंनी केलं तरूण सरपंच ऋतुराज देशमुखांचं कौतुक, ऋतुराजनं केलं कोरोनामुक्त गाव
सुरू राहील प्रकल्पाचे काम, दिल्ली HC ने याचिका फेटाळली; याचिकाकर्त्याला 1 लाखाचा दंड