मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – कधी वाद तर कधी प्रेम… सध्या अशा वेगवेगळ्या कारणांनी इंडियन आयडल ( Indian Idol) चर्चेत आहे. ‘इंडियन आयडल १२’ हा शो गेल्या काही दिवसांपासून वादांमुळे चर्चेत होता. आता हा शो कंटेस्टंटचा लव्ह अँगलमुळे चर्चेत आहे. सायली कांबळे Sayali Kamble हिची सेटवर बहणारी स्टोरी बाहेर आली आहे. टीआरपीसाठी ग्लॅमर आणि लव्ह स्टोरीचा तडका देण्याचे काम सध्या या शोमध्ये सुरू आहे. यासाठीच आधी शोमध्ये अरूणीता व पवनदीप यांचा लव्ह अँगल दाखवला गेला.
मराठा आरक्षणावरून शिवसेनेची गर्जना ! ‘दिल्लीत पुन्हा संयुक्त महाराष्ट्र लढ्याचा माहोल करावा लागेल’
सोनी वाहिनीने इंडियन आयडलच्या नव्या भागाचा प्रोमो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये निहाल किशोर कुमार यांचे ‘दिल क्या करे’ हे गाणं गाताना दिसत आहे. त्याच्या सादरीकरणानंतर होस्ट आदित्य नारायण असे काही बोलतो की, सगळेच हैराण होतात. निहाल गात होता तेव्हा सायली Sayali Kamble देखील संपूर्ण गाणं गुणगुणत होती, असे आदित्य म्हणतो. यावर, आम्ही दोघेही टॉम आणि जेरीसारखे आहोत आणि माझे त्याच्यावर प्रेम आहे, असे सायली म्हणते. यानंतर निहाल म्हणतो की, सायली कांबळे Sayali Kamble नेहमीच त्याची गाण्यात मदत करते. यावर सायली म्हणते की, हा भाग जरी गर्ल्स वर्सेस बॉईजचा असला, तरी निहालचे चांगलंच गाणार याची़ मला खात्री होती. मराठमोळी गायिका सायली कांबळे शोच्याच एका कंटेस्टंटच्या प्रेमात पडल्याचे दाखवलं जातेय. हा स्पर्धक कोण तर निहाल तारो.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंनी केलं तरूण सरपंच ऋतुराज देशमुखांचं कौतुक, ऋतुराजनं केलं कोरोनामुक्त गाव
काही जणांनी प्रेम व्यक्त केल्या बद्दल सायली कांबळेचे कौतुक केले आहे. तर काहींनी मात्र टीका केली आहे. हा केवळ इंडियन आयडलचा पब्लिसीटी स्टंट आहे. यापूर्वी देखील त्यांनी अशी खोटी प्रेम प्रकरणं उभी केली होती अशी टीका केली जात आहे. आता सायलीचे हे प्रेम प्रकरण खरं आहे की खोटं हे येत्या भागात सिद्ध होईल. शिवाय सायलीची ही प्रेमाची कबुली शोला किती टीआरपी मिळवून देईल, तेही दिसेन. इंडियन आयडलचा हा नवा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
मराठा आरक्षणावरून शिवसेनेची गर्जना ! ‘दिल्लीत पुन्हा संयुक्त महाराष्ट्र लढ्याचा माहोल करावा लागेल’
यंदाच्या उन्हाळ्यात दूध केवळ पिऊ नका तर चेहर्यावर देखील लावा, स्किन होईल ग्लो; जाणून घ्या
कोरोना काळात जर तुम्ही ऑफिसला जात असाल तर आवश्य ‘या’ Tips फॉलो करा, जाणून घ्या