T20 World Cup | अमेरिकेला मोठा झटका ! ICC ने T20 वर्ल्ड कप 2024च्या बाबतीत घेतला ‘हा’ मोठा निर्णय
वृत्तसंस्था – 2024 मध्ये होणाऱ्या आयसीसीच्या टी 20 वर्ल्ड कपसंदर्भात (T20 World Cup) एक मोठी बातमी समोर आली आहे. ICC ने टी 20 वर्ल्ड कप 2024 चे यजमानपद वेस्ट इंडिज आणि अमेरिका या दोन देशांना विभागून दिले होते. मात्र आता ICC ने यामध्ये बदल करून अमेरिकेला वगळण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने मागच्या वर्षी टी 20 वर्ल्ड कप 2024 च्या आयोजनाबाबत एक अधिकृत घोषणा केली होती. यामध्ये त्यांनी टी 20 वर्ल्ड कप 2024 हा अमेरिका आणि वेस्ट इंडिज या दोन देशांमध्ये होणार होता. मात्र आता हाती आलेल्या माहितीनुसार टी-20 वर्ल्ड कप 2024 चे सह-यजमानपद अमेरिकेकडून काढून घेण्यात आले आहे. युनायटेड स्टेट्स क्रिकेट संस्थेकडून असणाऱ्या स्पष्टतेच्या अभावामुळे हे सह-यजमानपद काढून घेण्यात आल्याचे समजत आहे.
अमेरिकेचा संघ प्रथमच आयसीसीच्या टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेत सहभागी होण्यासाठी
पात्र ठरलेला होता. आता ICC ने अमेरिकेकडून यजमान पद काढून घेतल्याने टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेत सहभागी
होण्यासाठी पात्र ठरलेला अमेरिकन क्रिकेट संघ स्पर्धेतून बाहेर पडू शकतो. मात्र याबाबत ICC ने अजून कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.
Web Title :- T20 World Cup | t20 world cup 2024 icc stripped usa off t20 world cup hosting rights
हे देखील वाचा :
Comments are closed.