लातूर : बहुजननामा ऑनलाइन – धनगर समाजाचा एस. टी. संवर्गात समावेश करून आरक्षण द्यावे, या मागणीसाठी पक्षविरहित धनगर मेळावा येत्या रविवारी (दि. २७) सायंकाळी ५ वाजता येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्कवर आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याचे उद्घाटन ॲड. अण्णाराव पाटील यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती ॲड. मंचकराव डोणे यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली.
या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी आपण स्वत: राहणार असल्याचे सांगून ॲड. डोणे म्हणाले, धनगर समाजाचा एस. टी. संवर्गात समावेश करावा, ही या समाजाची वास्तव, घटनात्मक व जुनी मागणी आहे. आजपर्यंत कोणत्याही सरकारने धनगर समाजाचा सहानुभूतीपूर्वक विचार केला नाही. चार वर्षांपूर्वी आरक्षणाचे आश्वासन दिल्यामुळे धनगर समाजाने भाजपला मते दिली, परंतु भाजप सरकारनेही आजपर्यंत यावर निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे या सरकारने फसवणूक केल्याचा राग समाजात आहे.
भाजप सरकारनेच मराठा समाजाला आरक्षण दिले : आ. हाळवणकर
आरक्षणासाठी धनगर समाज उत्स्फूर्तपणे एकत्र येत असून विविध भागांत आरक्षण मेळावे घेतले जात आहेत. या पार्श्वभूमीवरच लातूर येथे २७ जानेवारी रोजी धनगर मेळाव्याचे आयोजन केले आहे. मेळाव्यास प्रमुख पाहुणे म्हणून गोपीचंद पडळकर, उत्तमराव जानकर यांची उपस्थिती राहणार आहे. धनगर समाज बांधवांनी या मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन ॲड. मंचकराव डोणे यांनी केले.