मुंबई बहुजननामा ऑनलाइन – काल राज्यात मोठे राजकीय नाट्य घडले. शरद पवार आणि ईडी प्रकरणादरम्यान राष्ट्रवादीचे नेते आणि शरद पवारांचे पुतणे अजित पवार यांनी अचानक आपला आमदारकीचा राजीनामा दिला. त्यानंतर ते नॉट रिचेबल होते. त्यांना सर्वांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतू संपर्क झाली नाही. त्यामुळे कारण अस्पष्ट राहिले. यानंतर आज शरद पवारांच्या सिल्वर ओक बंगल्यावर कुटूंबीयांची चर्चा झाली. यात अजित पवार हजर होते. या चर्चेनंतर पत्रकारांशी बोलताना शरद पवारांनी सांगितले की चिंता करण्याचे कोणतेही कारण नाही.
शरद पवार म्हणाले की अजित पवार स्वत: धनंजय मुंडेच्या घरी पत्रकार परिषद घेऊन राजीनामा का दिला याचे उत्तर देतील आणि अजित पवार यावर सर्व काही स्पष्ट करेल. पत्रकारांनी सर्व ऑल इज वेल आहे का विचारल्यावर शरद पवारांनी स्पष्ट केले की माझ्या चेहऱ्यावर तुम्हाला कोणतीही चिंता दिसत आहे का, त्यामुळे चिंता करण्याची गरज नाही.
कुटूंबाशी चर्चा केल्यानंंतर अजित पवार यांनी देखील पत्रकारांना आपण पत्रकार परिषदेत सर्व काही सांगू असे सांगितले. ही परिषदेत धनंजय मुंडेच्या घरी दुपारी 3 वाजता पत्रकार परिषद होईल. या पत्रकार परिषदेतून स्पष्ट होईल की अजित पवार यांनी राजीनामा का दिला आणि त्यांची पुढील राजकारणातील भूमिका काय असणार आहे.
Visit : bahujannama.com