मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – Ready Reckoner Rate | रेडिरेकनरमध्ये कोणतीही दर वाढ झालेली नसल्याची माहिती शासनाच्या एका पत्राव्दारे समोर आली आहे. महाराष्ट्र शासनाचे उप सचिव सत्यनारायण बजाज यांनी मुख्य नियंत्रक महसूल प्राधिकारी तथा नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक (महाराष्ट्र राज्य़) यांना लिहीलेल्या एका पत्रामध्ये त्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे. (Ready Reckoner Rate)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
रेडिरेकनरमध्ये कोणतीही दर वाढ नाही@Policenama1 #policenama pic.twitter.com/VYTkne0iTq
— Policenama (@Policenama1) March 31, 2023
उप सचिव सत्यनारायण बजाज (IAS Satyanarayan Bajaj) यांनी पत्रामध्ये मुख्य नियंत्रक महसूल प्राधिकारी तथा नोंदणी महानिरीक्षक (Inspector General of Registration) व मुद्रांक नियंत्रक यांना सांगितले आहे की, वर्ष 2022-23 चे वार्षिक दर विवरणपत्र कोणताही बदल न करता, वर्ष 2023-24 मध्ये चालू ठेवण्यात यावे. तसेच विकासक व इतर सामान्य नागरिकांनी त्यांच्या मिळकतींच्या दरांबाबत वार्षिक बाजार मुल्य दर तक्त्यामध्ये वाढ किंवा घट करून देण्याची विनंती अर्ज नियमानुसार निर्णय घेण्यात यावेत.
यावरून रेडिरेकनरमध्ये कोणतीही दर वाढ झालेली नाही असे स्पष्ट होत असल्याचे दिसून येते.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title : No Rate Hike in Ready Reckoner Rate 2023-24? know details and saw govt letter
हे देखील वाचा :
MP Supriya Sule | ‘…अन्यथा हे सरकार महिलांबाबत असंवेदनशील ठरेल’- सुप्रिया सुळे