Ajit Pawar | ‘पुणे लोकसभा पोटनिवडणूक काँग्रेस लढवणार’, विजय वड्डेटीवारांच्या विधानानंतर अजित पवारांनी सुनावले, म्हणाले-‘माणुसकी नावाचा प्रकार आहे की…’

Ajit Pawar | ajit pawar reaction on vijay wadettiwar statement on pune loksabha bypoll

पुणे : बहुजननामा ऑनलाईन  पुण्याचे भाजपचे खासदार गिरीश बापट यांचे निधन झाले (BJP MP Girish Bapat Passed Away) आहे. त्यामुळे रिक्त झालेल्या या जागेवर आता पोटनिवडणूक (Pune Lok Sabha By-Election) होण्याची शक्यता आहे. यातच काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Congress Leader Vijay Wadettiwar) यांनी पुण्यातील लोकसभा पोटनिवडणूक काँग्रेस लढवणार असल्याचे विधान केले आहे. यावरुन राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली असताना विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी वडेट्टीवार यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. घाई करायची काय गरज आहे? माणुसकी नावाचा प्रकार आहे की नाही, अशा शब्दात अजित पवारांनी (Ajit Pawar) वडेट्टीवारांना सुनावलं. ते पुण्यात बोलत होते.

 

 

काय म्हणाले विजय वडेट्टीवार ?

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये विजय वडेट्टीवार यांनी म्हटले की, आमची आघाडी ठरलेली आहे आणि त्या माध्यमातून आम्ही पुणे लोकसभेची पोटनिवडणूक लढवणार आहोत. तसेच भाजपने यापूर्वी झालेल्या पोटनिवडणुकीत अनेकदा उमेदवार दिले आहेत. त्यामुळेच आता ज्या ठिकाणी पोटनिवडणूक होईल, ती पोटनिवडणूक महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) लढवेन, असे वडेट्टीवार यांनी म्हटले.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

अजित पवारांनी वडेट्टीवारांना सुनावलं

विजय वडेट्टीवार यांच्या वक्तव्यावर अजित पवार (Ajit Pawar) यांनी त्यांना चांगलंच सुनावले आहे.
लगेच कोणी गुडघ्याला बाशिंग बाधायची गरज नाही. गिरीश बापट यांच्या निधनाला केवळ तीन दिवस झाले आहेत.
घाई करायची काय गरज आहे? माणुसकी नावाचा प्रकार आहे की नाही. महाराष्ट्राच्या काही परंपरा आहेत.
अशी विधानं केली तर महाविकास आघाडीला जनाची नाही, तर मनाची लाज वाटते की नाही, असं लोकं म्हणतील,
अशा शब्दात अजित पवार यांनी वडेट्टीवार यांच्या विधानाचा समाचार घेतला.

 

Web Title :-  Ajit Pawar | ajit pawar reaction on vijay wadettiwar statement on pune loksabha bypoll

 

हे देखील वाचा :

MP Supriya Sule | ‘…अन्यथा हे सरकार महिलांबाबत असंवेदनशील ठरेल’- सुप्रिया सुळे

MLA Sanjay Shirsat | मविआच्या संभाजीनगर सभेवरुन संजय शिसराट यांची खोचक टीका, म्हणाले-‘ही सभा म्हणजे केवळ…’

Pune Crime News | अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन केले गर्भवती; हडपसर पोलिसांनी तरुणाला केली अटक