Ajit Pawar | रोहित माझ्या मुलासारखा, मी असं का करु?, अजित पवारांची स्पष्टोक्ती

Ajit Pawar | ajit pawar reaction on shivsena naresh mhaske allegation over rohit pawar mca elections

पुणे :  बहुजननामा ऑनलाईन – महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या (Maharashtra Cricket Association) अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत (Presidential Election) रोहित पवार (Rohit Pawar) यांना पाडण्यासाठी अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रयत्न केल्याचा गौप्यस्फोट शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनी केला आहे. यावर अजित पवार यांनी पुण्यात माध्यमांशी बोलताना सांगितले की, रोहित पवार माझा पुतण्या आहे, घरातील आहे. मुलासारखा आहे. त्यामुळे रोहितबाबत मी असे काही करणार नाही, अशी स्पष्टोक्ती अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिली.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

अजित दादांनी अनेकांना फोन करुन महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत रोहितला पाडा, अशा सूचना दिल्याचा आरोप नरेश म्हस्के यांनी केला. त्यावर बोलताना अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, नरेश म्हस्के यांना मी ओळखत नाही. कोणीही काहीही बोलेल, त्यावर मी प्रतिक्रिया देणार नाही. मी समोर आणि पाठिमागे एकच बोलतो आणि माझ्या घरातच मी असे काही करणार नाही. रोहित माझा पुतण्या आहे. घरातील आहे. माझ्या मुलासारखा आहे. त्यामुळे रोहित बाबत मी काहीही करणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

 

 

काय म्हणाले नरेश म्हस्के?

निवडणूक (Presidential Election) जानेवारी महिन्यात झाली होती. या निवडणुकीत रोहित पवार निवडून आले.
परंतु, आता या निवडणुकीवरून महाराष्ट्राचे राजकारण (Maharashtra Politics News) तापण्याची चिन्ह असल्याचे सांगितले जात आहे.
पवार कुटुंबात कोणती व्यक्ती रोहित पवारांना पाडा म्हणून सगळ्यांना निरोप देत होते, अजित पवार साहेब,
आधी आपले घरातील बघा आणि नंतर मुख्यमंत्र्यांवर टीका करा, असा पलटवार नरेश म्हस्के यांनी केला.
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत रोहित पवारांना पाडण्याचा प्रयत्न अजित पवार यांनी केल्याचा खळबजनक गौप्यस्फोट नरेश म्हस्के यांनी केला आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

Web Title :-   Ajit Pawar | ajit pawar reaction on shivsena naresh mhaske allegation over rohit pawar mca elections

 

हे देखील वाचा :

Ready Reckoner Rate | 2023-24 मध्ये रेडिरेकनरमध्ये कोणतीही दर वाढ नाही? जाणून घ्या सविस्तर

Ajit Pawar | ‘पुणे लोकसभा पोटनिवडणूक काँग्रेस लढवणार’, विजय वड्डेटीवारांच्या विधानानंतर अजित पवारांनी सुनावले, म्हणाले-‘माणुसकी नावाचा प्रकार आहे की…’

MP Supriya Sule | ‘…अन्यथा हे सरकार महिलांबाबत असंवेदनशील ठरेल’- सुप्रिया सुळे