बहुजननामा ऑनलाइन – हाथरस पीडित तरुणीवर बलात्कार झाला नसल्याचे (no rape )न्यायवैद्यक अहवालातून स्पष्ट झाल्याचा दावा उत्तर प्रदेश पोलिसांनी केला आहे. त्यामुळे देशभरात पडसाद उमटत असलेल्या प्रकरणाला नव्या वादाला तोंड फुटले आहे. पीडित तरुणीवर 14 सप्टेंबर रोजी चार जणांनी बलात्कार(no rape )केल्याचा आरोप आहे. तरुणीचा मंगळवारी दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात मृत्यू झाला. तिचे पार्थिव घरी घेऊन जाण्याची कुटुंबीयांची मागणी धुडकावून पोलिसांनी मध्यरात्री तिच्यावर अंत्यसंस्कार केले. या प्रकरणाचे देशभरात तीव्र पडसाद उमटत असतानाच पोलिसांनी गुरुवारी नवा दावा(no rape )केला.
गळ्याजवळ झालेली दुखापत आणि त्यामुळे झालेल्या मानसिक आघातामुळे पीडितेचा मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालात म्हटले आहे. तपासणी केलेल्या नमुन्यांमध्ये शुक्राणू आढळले नसल्याचे न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पीडित तरुणीवर बलात्कार किंवा सामूहिक बलात्कार झालेला नसल्याचे स्पष्ट होते”, असा दावा अतिरिक्त पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) प्रशांत कुमार यांनी केला. पीडित तरुणीने पोलिसांना दिलेल्या जबानीत बलात्काराचा उल्लेख केलेला नसून, केवळ मारहाण झाल्याचे त्यांनी सांगितले आहे.
सामाजिक सलोखा बिघडविण्याबरोबरच जातीय हिंसाचार घडविण्यासाठी काही जणांनी वस्तुस्थितीचा विपर्यास केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तातडीने पावले उचलली असून, सामाजिक सलोखा बिघडविण्याचा प्रयत्न करणार्यांची ओळख पटविण्यात येत असल्याचे प्रशांत कुमार म्हणाले.