बहुजननामा ऑनलाइन – हाथरस प्रकरणाची स्वतःहून अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ (lucknow)खंडपीठाने दखल घेतली आहे. त्यानुसार त्यांनी उत्तर प्रदेश सरकारच्या वरिष्ठ अधिकार्यांना नोटीस बजावली आहे. हायकोर्टाने डीजीपी, एडीजी (कायदा व सुव्यवस्था), डीएम हाथरस, एसपी हाथरस यांना समन्स(lucknow) बजावले आहे. पुढील सुनावणी 12 ऑक्टोबर रोजी होणार आहे.
अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती राजन रॉय आणि न्यायमूर्ती जसप्रीत सिंग यांनी सुमोटो दाखल करुन घेतली आहे. त्यांनी पीडित मुलीचे घाईघाईत अंत्यसंस्कार करण्यासंदर्भात ही दखल घेतली आहे. हाथरस जिल्हातील एका गावात 14 सप्टेंबरला मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली. घटनेनंतर पीडितेला अलीगडच्या जेएन मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.
उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. पीडितेच्या कुटूंबासाठी सरकारने 10 लाख रुपयांच्या मदतीची घोषणा केली आहे. दरम्यान, सात्वंवनासाठी हाथरसला पायी चालत जाणार्या राहुल गांधींना पोलिसांकडून धक्काबुक्की करण्यात आली.