नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान म्हणून सलग दुसऱ्या कार्यकाळासाठी नरेंद्र मोदी यांनी गुरूवारी शपथ घेतली. त्यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळात ५७ सदस्यांना स्थान मिळाले. मोदी सरकारच्या मंत्रालयातील अर्थमंत्रालयाचा कार्यभार निर्मला सीतारमण यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. हा पदभार स्वीकारणाऱ्या त्या पहिल्या महिला अर्थमंत्री ठरल्या आहेत. याआधीच्या मोदी सरकारमध्ये त्यांच्या कडे संरक्षण मंत्रालय सोपवण्यात आले होते. तेव्हा त्या पहिल्या संरक्षण मंत्री ठरल्या होत्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळाने सलग दुसऱ्यांदा शपथ घेतल्यानंतर कोणाला कोणती पदे मिळणार याबाबत कमालीची उत्सूकता होती. अरुण जेटली यांनी प्रकृतीच्या कारणाने मंत्रिपद देऊ नये, अशी विनंती केली होती. असे पत्रही त्यांनी पंतप्रधान मोदी यांना लिहले होते. यानंतर अर्थमंत्रालयाची जबादारी अमित शहांकडे जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. या स्पर्धेत अर्थमंत्री म्हणून पियुष गोयल यांचेही नाव अग्रस्थानी होते. परंतु, अमित शहा यांना गृहमंत्री तर पियुष गोयल यांना रेल्वेमंत्रालयाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तर निर्मला सीतारामन यांना पहिल्या महिला अर्थमंत्री होण्याचा मान मिळाला.