पुणे : बहुजननामा ऑनलाइन – पानशेत आणि खडकवासला धरण १०० % भरले असल्याने पानशेत धरणातून मोठ्या प्रमाणावर नदीत विसर्ग सुरु झाला आहे. पुणे शहरात पूरजन्य परिस्थिती आहे. रविवारी सकाळी ११ वाजता खडकवासला धरणातून तब्बल ३५ हजार ५७४ क्युसेस पाणी सोडण्यात येणार आहे. त्यामुळे मुठा नदीलगतच्या जवळपास सर्वच भागात पाणी शिरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
आठवड्यापासून खडकवासला धरणातून नियमितपणे मोठ्या प्रमाणावर पाणी मुठा नदीत सोडण्यात येत आहे. गेल्या दोन दिवसापासून मुठा नदीचे पात्र अगदी ओसंडून वाहत आहे. शनिवारी रात्री जोरदार पाऊस पडला असून रविवारी सकाळी देखील पाऊस चालू असल्याने पानशेत व खडकवासला धरणात मोठ्या प्रमाणावर पाणी येत आहे. खडकवासला धरणातून पाणी सोडण्यात येणार असल्याने प्रशासनाने पुणेकरांना सावधानतेचा इशारा दिला आहे.
विशेष करून शिवणे, उत्तमनागर, खिलरेवस्ती, सिंहगड रोड, शिवाजीनगर, जुना बाजार, ढोले-पाटील रोड, औंध, दापोडी, बोपोडी, येरवडा, हडपसर, आणि ओंकारेश्वर मंदिर परिसरातील नागरिकांना दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मनपा प्रशासनाने नदीलगत राहणाऱ्यांना सावधानतेचा इशारा दिला आहे. पोलीस प्रशासन देखील याबाबत काळजी घेत आहे. नवी मुंबई येथील पांडवकडा येथे घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर युवकांनी धबधबा आणि इतर डोक्याच्या ठिकाणी काळजी घ्यावी असे आवाहन देखील करण्यात आले आहे. शनिवारी पांडवकडा येथे ४ मुली वाहून गेल्या होत्या त्यामुळं पोलीस सतर्क झाले आहेत.
khadakwasala Complex gauges :
4.8.2019/6.00Hrs
Rain(mm/Total/TMC/%)
1)Khadakwasala –
32/791/1.97/100%
NMRBC-1054
ww-27203
2)Panshet– 123/2210/10.65/100%
PH-00
ww-12936
LLIO-00
3)Warasgaon–
120/2198/12.62/98.46%
ww-00
PH–00
HLIO-00
LLIO-00
4)Temghar-
111/3044/3.23/87.19%
ICPO–213
PH–350
Total contents of 4 Dams-
28.48 TMC/97.69%
Last year-
25.41 TMC/ 87.17%