टेक्सास : वृत्तसंस्था – अमेरिकेच्या टेक्सास शहरातील एका शॉपिंग मॉलमध्ये शनिवारी काही हल्लेखोरांनी बेछूट गोळीबार केला असून त्यामध्ये कमीत कमी २० जणांचा मृत्यू झाल्याची भिती व्यक्त करण्यात आली आहे. ‘अल पासो’च्या प्रामुख्याने या माहितीला दुजोरा दिला असून ३ संशयितांना ताब्यात घेतले असल्याचे सांगण्यात आले आहे.
टेक्सासच्या ‘अल पासो’ या शॉपिंग मॉलमध्ये ही गोळीबाराची घटना घडली असून त्यात २० जणांचा मृत्यु झाला आहे तर, २६ जण जखमी झाल्याचे वृत्त आहे.
https://twitter.com/realDonaldTrump/status/1157745635254243329
टेक्सासमधील या घटनेबाबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दु:ख व्यक्त केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, टेक्सासमध्ये गोळीबाराची घटना घडली. त्यात काही निरपराध लोकांचा मृत्यु झाला ही दु:ख देणारी घटना आहे. अधिकारी कायद्यानुसार काम करीत आहेत. या घटनेबाबत गर्व्हनर यांच्याशी बातचित झाली असून ईश्वर आपल्या सर्वांच्या बरोबर आहे.
Texas Governor Greg Abbott and El Paso police say 20 people have been killed and 26 others wounded in a shooting at an El Paso shopping center. Investigating authorities say "hate crime among the possibilities": Associated Press https://t.co/Yn2nLNDk0y
— ANI (@ANI) August 4, 2019
स्थानिक टीव्ही चॅनेलने याबाबत सर्वप्रथम १८ जणांना गोळी लागल्याचे वृत्त दिले होते. मात्र, त्यात किती जणांना मृत्यु झाला याची माहिती देण्यात आली नव्हती. गोळीबारामध्ये २० जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. हा गोळीबार कशामुळे करण्यात आला हे समजले नाही. या घटनेमुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.