चंद्रपूर : बहुजननामा ऑनलाइन – तेली समाजबांधवांनी राजकीयदृष्ट्या संघटित होणे काळाची गरज असल्याचे मत प्रांतिक तैलीक महासभेचे अध्यक्ष प्रकाश देवतळे यांनी केरोडा येथे आयोजित संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज जयंती महोत्सव व समाप्रबोधन कार्यक्रमात केले. सावली तालुक्यातील केरोडा येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते उद्घाटक म्हणून बोलत होते.
यावेळी संताजी जनगाडे महाराजांची पालखी मिरवणूक काढण्यात आली. कार्यक्रमाचे उद्घाटन प्रकाश देवतळे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी गडचिरोलीचे नगरेसवक रमेश भुरसे होते. प्रमुख अतिथी म्हणून बाबुराव कोहळे, माजी. जि.प. सदस्य तुळशीराम कुनघाडकर, वैशाली कुकडे, अनंत चिटनूरवार, गणपत कोठारे, केशव मुरडकर, ईश्वर गंडाटे, भाऊ राव कोठारे आदी उपस्थित होते.
ग्रामीण क्षेत्रातील तेली समाजबांधव अतिशय हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेत असल्याने त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन यावेळी प्रकाश देवतळे यांनी केले. यशस्वीतेसाठी केरोडा मंडळाचे अध्यक्ष ठिवरू भुसरे, उपाध्यक्ष एकनाथ नैताम, सचिव दीपक भुटके, गुरुदेव भुरसे, सुभाष चलाख, किशोर पिपरे व तेली समाजबांधवांनी सहकार्य केले.