नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दोन दिवसांपासून चंद्राच्या चहूबाजूंनी 35 किमीच्या उंचीवर फिरत असलेला ‘चांद्रयान 2’ सहा ते सात सप्टेंबर दरम्यान रात्री चंद्राच्या पृष्ठभागावर पाऊल टाकेल. 978 कोटींच्या या मिशनवर भारतासहित पूर्ण जगाचे लक्ष लागलेले आहे.1471 किलोच्या ‘विक्रम’ या लँडरची लँडिंग सॉफ्ट झाली तर भारत असे करणाऱ्या चार देशात समाविष्ट होईल. चंद्रावर आतापर्यंत अमेरिका, रशिया आणि चीन यांनी आपलं यान उतरवलं आहे.
बंगळुरुमध्ये असणारी भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इसरो)चे वैज्ञानिक लँडिंगच्या अंतिम तयारीत व्यस्त आहेत. एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, “सर्वांच लक्ष विक्रमच्या हालचालींवर आहे.” इसरोचे अध्यक्ष के. सिवन यांनीही लँडिंग खूप आव्हानात्मक असल्याचं सांगितलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी इसरोला जाऊन 70 शाळकरी मुलांसोबत सॉफ्ट लँडिंग पाहणार आहेत.
अशी होणार लँडिंग
रात्री 1 ते 2 वाजताच्या दरम्यान विक्रम आणि त्यातील रोवर प्रज्ञान ला बूस्टर प्रोपल्शन सिस्टीमच्या मदतीने लँडिंगसाठी तयार करण्यात येईल.
1.30 ते 2.30 च्या दरम्यान विक्रम चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरवलं जाईल. या भागात आजपर्यंत कोणत्याच देशाने लँडिंग केलेलं नाही.
5.30 ते 6.30 दरम्यान 6 चाकांचा 27 किलोचा प्रज्ञान लँडरमधून बाहेर पडेल. हा चंद्राच्या पृष्ठभागावर 500 मीटर चालेल. याच्या चाकांवर कोरलेलं राष्ट्रीय चिन्ह चंद्राच्या धरतीवर अंकित होईल.
सॉफ्ट लँडिंगची शक्यता जास्त
चांद्रयान 1 चे संचालक ए अन्नादुरई म्हणाले की, “इस्रोकडे 40 हून अधिक जिओसिंक्रोनस इक्वेटेरियल ऑर्बिट(जीओ) मिशन हाताळण्याचा अनुभव आहे. त्यामुळे सॉफ्ट लँडिंग यशस्वी होण्याची पूर्ण आशा आहे. जवळपास 35 किमी उंचीवरून विक्रम 15 मिनिटात उतरेल.
चंद्राच्या धरतीचे रहस्य शोधून काढतील विक्रम आणि प्रज्ञान
विक्रम आणि प्रज्ञान एक चंद्र दिवस(पृथ्वीचे 14 दिवस) काम करेल. चंद्राच्या कक्षेत फिरता फिरता ऑर्बिटर एक वर्ष शोध आणि अध्ययन करत राहिल. या मिशनचा उद्देश चंद्रावर उपलब्ध खनिजे-धातू आणि तत्वांचा शोध घेणं आणि अभ्यास करणं आहे. याशिवाय चंद्राची मॅपिंग आणि पाण्याचा शोध घेणं आहे.
- ‘रक्तदान’ करण्यापूर्वी लक्षात ठेवा ‘या’ ७ गोष्टी, अन्यथा होईल वाईट परिणाम
- तारुण्यातच टक्कल पडले असल्यास तुमच्यासाठी आहेत ‘हे’ रामबाण उपाय
- ‘हळद’ आरोग्यासाठी चांगली, परंतु या लोकांनी चुकूनही सेवन करू नये
- चहापत्तीने ‘केस’ होतात काळे, करून पाहा ‘हे’ ५ घरगुती उपाय
- लग्नानंतरही बिपाशा बसु आहे फिट, जाणून घ्या तिचे 11 ‘ब्युटी सिक्रेट’
- हातांच्या तळव्यांना पाहून कळतात ‘लिव्हर डॅमेज’सहीत ‘हे’ ५ आजार, जाणून घ्या
- ‘सोनम कपूर’लाही आहे ‘डायबिटीज’, रुग्णांनी ‘या’ ४ गोष्टींची घ्यावी काळजी
- बुद्धी तल्लख, तर अॅलर्जी होईल दूर, काही दिवस रोज खा ‘पाइन नट्स’
केवळ अशा लोकांनाच असते ‘सरोगेसी’द्वारे अपत्यप्राप्तीची परवानगी