पुणे : बहुजननामा ऑनलाईन – तिवरे धरण खेकड्यांनी पोखरल्यामुळे फुटल्याचा दावा केल्यानंतर टीकेचा विषय ठरलेले जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांच्या घराबाहेर खेकडे सोडून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अनोखे आंदोलन केले.
तानाजी सावंत यांच्या घरी खेकड्यांनी धुमाकूळ घातला. त्यांचं निवासस्थान फोडण्याचा प्रयत्न खेकड्यांनी केल्याची माहिती राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना मिळाली. त्यानंतर आम्ही सर्वांनी जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांच्या घरासमोर धाव घेतली. या खेकड्यांना पकडून आम्ही भारती विद्यापीठ पोलिसांच्या स्वाधीन केले. असा दावा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.
#WATCH: NCP workers stage protest and threw crabs outside the residence of Maharashtra Water Conservation Minister Tanaji Sawant in Pune against his statement on Ratnagiri's Tiware dam breach. The Minister had said that crabs were responsible for the breach in the dam. pic.twitter.com/7wbsT8yGIs
— ANI (@ANI) July 9, 2019
खेकड्यांवर ३०२ अंतर्गत गुन्हा दाखल करा
तिवरे धरण फोडल्यानंतर खेकड्यांनी मंत्र्यांचं घर फोडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे तातडीने त्यांच्यावर ३०२ कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा. अन्यथा ते उद्या अजून काहीतरी मोठी दुर्घटना घडवू शकतील अशी उपरोधिक तक्रार राष्ट्रवादीने केली आहे.