मुंबई बहुजननामा ऑनलाइन – सुनील तटकरे हे राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश करतील, अशी चर्चा काही दिवसांपूर्वी रंगली होती. मात्र आता तटकरे यांचे पुतणे आमदार अवधूत तटकरे हे लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार आहेत अशी जोरदार चर्चा सुरु झाली आहे.अवधूत तटकरे यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्च्यांना उधाण आले आहे.
रायगडमध्ये तटकरे विरुद्ध तटकरे
सुनील तटकरे यांच्याशी मतभेद झाल्यानंतर त्यांचे पुतणे आणि आमदार अवधूत तटकरे यांचे भाऊ संदीप तटकरे यांनी 2016 मध्येच शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर आता अवधूत तटकरे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याने आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणांची जुळवाजुळव सुरु असतानाच तटकरे कुटुंबीयांसाठी हा मोठा राजकीय धक्का असेल.
अवधूत तटकरे हे रोह्याचे माजी नगराध्यक्ष असून विद्यमान आमदार आहेत, सुनील तटकरे यांचे राजकीय वारसदार म्हणून अवधूत तटकरे यांच्याकडे पहिले जात होते त्यामुळेच सुनील तटकरे विधानपरिषदेवर गेल्यावर अवधूत तटकरे आमदार झाले होते तेव्हापासून राजकीय वर्तुळात त्यांचा दबदबा वाढला आहे.