मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. ब्रीच कँडी रुग्णालयात मंगळवारी रात्री उशिरा ही शस्त्रक्रिया पार पडली. त्यानंतर खासदार आणि पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनी सोशल मिडियावर याची माहिती देत डॉक्टरांचे आभार मानले आहेत.
पवार यांच्या गॉल ब्लॅडरमधील स्टोन काढण्याची शस्रक्रिया झाली. अर्ध्या तासाची शस्रक्रिया होती. शरद पवारांची तब्येत स्थिर आहे. मात्र पुन्हा एक शस्रक्रिया पार पड़ेल. एक मोठा स्टोन होता. यामुळे वेदना होत असल्याने हा स्टोन काढ़ण्यात आला आहे.
शरद पवार यांच्या पोटात अचानक दुखु लागल्याने मंगळवारी सायंकाळी मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. वास्तविक शरद पवार हे बुधवारी रुग्णालयात दाखल होणार होते. त्यानंतर त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली जाणार होती. पण अचानक पोटात दुखत असल्याने त्यांना सायंकाळी रुग्णालयात दाखल केले गेले. वेगवेगळ्या चाचण्या केल्यानंतर रात्री उशिरा डॉक्टरांनी शस्त्रक्रिया केली.
Thanking Dr.Maydeo, Dr. Golwala, Dr.Pradhan, Dr.Daftary, Dr. Samdani, Dr. Tibrewala and Breach Candy Hospital Team 🙏🏻 pic.twitter.com/SlUD8jh4by
— Supriya Sule (@supriya_sule) March 30, 2021
यावेही सुप्रिया सुळे, जावई सदानंद सुळे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे, अन्न धान्य पुरवठा मंत्री छगन भुजबळ उपस्थित होते. शस्त्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर राजेश टोपे यांनी त्याची माहिती दिली. सुप्रिया सुळे यांनी शरद पवार यांच्यावर शस्त्रक्रिया केलेल्या डॉक्टरांचा फोटो शेअर करुन आभार मानले आहेत.