बहुजननामा ऑनलाईन –
मेष
आजचा दिवस उत्तम लाभदायक आहे. नोकरीशी संबंधीत जातकांना आज उच्च पदाची प्राप्ती होऊ शकते. एखादा कौटुंबिक कलह वर डोके काढू शकतो, ज्यामुळे मनात अशांतता आणि चिडचिड राहिल. आर्थिकस्थिती चांगली होईल. सायंकाळी धनलाभाची शक्यता आहे. सायंकाळचा वेळ एखाद्या मंगलकार्यात घालवाल.
वृषभ
आजचा दिवस संमिश्र आहे. कुटुंबात एखादा वाद असेल तरी वातावरण शांत राहिल. नोकरीत एखाद्याच्या सहकार्याने धनप्राप्ती होऊ शकते. अनावश्यक खर्च टाळा, तरच आर्थिकस्थिती चांगली होईल. सायंकाळपासून रात्रीपर्यंतचा वेळ मित्रांसमवेत मौजमस्तीत घालवाल. व्यापारात भरपूर लाभ होईल. कौटुंबिक जीवनात समरसता राहिल.
मिथुन
आज सकाळपासूनच सुखद वार्ता समजतील. नोकरीत काही अधिकार्यांच्या कृपेने पदोन्नतीचे योग आहेत. राहणीमान, खाण्या-पिण्याचा स्तर वाढेल. नवीन कपडे खरेदी कराल. भागीदारीत व्यवसाय करायचा असेल तर दिवस उत्तम आहे, जो भविष्यात लाभ देईल.
कर्क
आजचा दिवस संमिश्र परिणामांचा आहे. संतती सुखात वाढ होईल. एखाद्या मित्राकडून भेट मिळेल. विद्यार्थ्यांना परीक्षेत जास्त मेहनतीची आवश्यकता आहे. सायंकाळ कुटुंबातील छोट्यांसह मजामस्तीत घालवाल. चांगल्या मित्रांच्या सहकार्याने मनातील निराशेची भावना दूर होईल. व्यापारासाठी छोटा प्रवास करावा लागू शकतो.
सिंह
आजचा दिवस मंगलकार्यात व्यतीत होईल. ज्यामुळे मन प्रसन्न राहिल. व्यस्त रहाल. उत्पन्न वाढेल आणि मोठ्या प्रमाणात पैसे हातात येतील, ज्यामुळे मनोबल वाढेल. सायंकाळी आरोग्याच्या बाबतीत सतर्क रहा. कारण पचनक्रिया मंद, वायु विकार यासारख्या समस्या त्रास देऊ शकतात, यासाठी खाण्या-पिण्यावर नियंत्रण ठेवा. विद्यार्थ्यांना पैशाच्या कमतरतेचा सामना करावा लागू शकतो.
कन्या
आजचा दिवस उत्पन्नात मनासारखी वाढ होण्याचा आहे. परंतु नोकरीत रागावर नियंत्रण ठेवावे लागेल, अन्यथा अडचणीत सापडू शकता. संततीच्या बाजूने एखादी सुखद वार्ता समजू शकते. सायंकाळचा वेळ मित्रांसोबत पार्टीत घालवाल. जोडीदारासाठी काही शॉपिंग करू शकता, ज्यामुळे जोडीदार आनंदी दिसेल. जे लोक परदेशाशी व्यापार करतात, त्यांना आज एखादी शुभवार्ता समजू शकते, जी त्यांच्या व्यापारासाठी नवी गती देईल.
तुळ
आजचा दिवस ठोस परिणाम घेऊन येईल. बिझनेसमध्ये जर कुणाला भागीदार बनवण्याचा विचार करत असाल तर दिवस उत्तम आहे. संतती आपल्या भविष्यासाठी आज तुमच्याशी एखादी चर्चा करू शकते, जे पाहून तुम्हाला चांगले वाटेल. आईशी मतभेद होऊ शकतात. आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवा, वाद वाढू देऊ नका. मामाच्या बाजूने धनलाभाची भरपूर शक्यता आहे. विद्यार्थ्यांना भविष्याची चिंता सतावू शकते.
वृश्चिक
जर संतती संबंधी काही समस्या सुरू असेल तर आज ती संपेल, कारण संतती आपल्या भविष्यासाठी योजना तयार करताना दिसेल, जे पाहून तुम्हाला दिलासा मिळेल. वडीलांशी आज सल्ला-मसलत करावी लागेल, तरच व्यापारात पुढे जाण्यात यशस्वी व्हाल. जोडीदाराचे भरपूर सहकार्य मिळेल. प्रेमसंबंधासाठी वेळ काढण्यात यशस्वी व्हाल. जवळपासच्या ठिकाणी वाद टाळावा लागेल.
धनु
आज कठोर मेहनत करावी लागेल, तेव्हाच यश मिळेल. यासाठी आळस दूर सारून पुढे जावे लागेल आणि रखडलेली कामे पूर्ण करावी लागतील. व्यापारात एखाद्या अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेण्याची आवश्यकता असेल. नोकरीत तणावाची स्थिती राहिल. विद्यार्थ्यांना रणनिती तयार करून अभ्यास करावा लागेल, तरच यश मिळेल.
मकर
आजचा दिवस संमिश्र परिणामांचा आहे. नोकरी आणि व्यापारात तुमच्या धाडसामुळे शत्रु नष्ट होताना दिसतील, ज्यामुळे तणाव कमी होईल. सायंकाळचा वेळ कुटुंबासोबत जवळचा प्रवास करू शकता. घरात पाहुण्यांची ये-जा राहिल. जर एखादा कायदेशीर वाद सुरू असेल तर त्यामध्ये यश मिळेल.
कुंभ
आजचा दिवस कार्यक्षेत्रासाठी अतिशय महत्वाचा आहे. आज तुमच्यावर जबाबदारीचे ओझे वाढू शकते. यासाठी कोणतेही धोरण बनवण्यापूर्वी लक्ष द्या. रोजगारासाठी प्रयत्न करणार्या जातकांसाठी दिवस उत्तम आहे. विवाहासाठी इच्छूक जातकांसाठी चांगले प्रस्ताव येतील. जर सासरच्या बाजूकडील एखाद्या व्यक्तीला पैसे द्यायचे असतील तर ते आज टाळा, अन्यथा संबंध बिघडू शकतात.
मीन
आजचा दिवस संमिश्र आहे. श्रद्धा, धर्मकार्यात रूची वाढेल. जर एखाद्या संपत्तीमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर ती इच्छा आज पूर्ण होईल. मुलगा किंवा मुलीच्या बाबतीत आरोग्याची चिंता त्रास देऊ शकते. यासाठी बाहेर खाणे-पिणे टाळा. आज रात्रीचा वेळ आई-वडीलांच्या सेवेत घालवाल, ज्यामुळे मान सन्मान वाढेल.