बहुजननामा ऑनलाइन टीम- राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची रविवारी अचानक प्रकृती बिघडल्याने त्यांच्या पोटात दुखत होते. यानंतर पवार यांना ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी दाखल केले असता त्यांना पित्ताशयाचा त्रास असल्याचे तपासामधून समोर आले. त्यानंतर त्यांच्यावर काल काल ब्रीच कॅंडी रुग्णालयात एक शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. ही शस्त्रक्रिया काल रात्री करण्यात आली आहे. दरम्यान काल रात्री शस्त्रक्रिया झाली आणि सकाळी शरद पवारांनी रुग्णालयातच आपली नेहमीची दिनचर्चा चालू ठेवली. सकाळी-सकाळी पवारांनी नेमही प्रमाणेच रुग्णालयात पेपर वाचाण्यास सुरुवात केली. दरम्यान पवारांचा हा पेपर वाचतानाचा फोटो सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून ऐवढी ऊर्जा येते तरी कुढून असा प्रश्नच सर्वांना पडला आहे.
सुप्रभात, ब्रीच कँडी रुग्णालयातील सर्व डॉक्टर्स,परिचारीका आणि सपोर्टिंग स्टाफ यांचे मनापासून आभार. ही आजची प्रसन्न सकाळ आहे आणि आदरणीय @PawarSpeaks साहेब त्यांचं रोजचं सर्वात आवडतं काम अर्थात वर्तमानपत्रांचं वाचन, करीत आहेत. pic.twitter.com/ERf0Gl35Tp
— Supriya Sule (@supriya_sule) March 31, 2021
दरम्यान पवारांच्या या फोटोला कोणी #ऊर्जा तर कोणी म्हणाले ही ऊर्जा येते तरी कुढून असे कॅप्शन ठेवून पवारांचा फोटो शेअर केला आहे.