नवी मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – पीएमसी बँक घोटाळ्या प्रकरणी आणखी एका खातेदाराने आत्महत्या केल्याची घटना खारघर येथून सामोर आली आहे. बँकेत अडकलेले आपले पैसे परत मिळतील की नाही या चिंतेने खातेदार महिलेचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. बुधवारी रात्री पीएमसी बँकेसंदर्भातील बातम्या पाहून झोपी गेल्यानंतर दोन तासांतच त्यांचा मृत्यू झाला. कुलदिपकौर विग (६४) असे या महिलेचे नाव आहे.
पीएमसी बँकेमध्ये कुलदिपकौर व त्यांच्या कुटुंबीयांचे सुमारे १७ लाख रुपये अडकले होते. त्या खारघर सेक्टर-१० मध्ये आपल्या संपूर्ण कुटुंबासमवेत भाड्याच्या खोलीत राहत होत्या. पीएमसी बँकेमध्ये कुलदिपसिंग व वरिंदरसिंग या पतीपत्नीच्या खात्यामध्ये दीड लाख रुपयांची तर मुलगा सुखबीर याच्या खात्यामध्ये ७० हजारांची रक्कम होती. या तिघांच्या नावे बँकेत १५ लाख रुपयांचे फिक्स डिपॉझिट होते.
दरम्यान पीएमसी बँकेच्या घोटाळ्यामुळे निर्बंध लादण्यात आल्यानंतर अनेकांचे पैसे या बँकेत अडकले आहेत. पैसे नसल्याने विग कुटुंबियांनी यावर्षी दिवाळीही साजरी केली नाही. आपले बँकेतील पैसे बुडतील, अशी भीती कुलदिप कौर यांना होती. त्यामुळे कुलदिपकौर दररोज पीएमसी बँकेशी संबधित अपडेट घेत होत्या. बुधवारी रात्रीही पीएमसी बँकेसंदर्भात बातम्या बघितल्यानंतर आपल्या पतीशी बँकेत अडकलेल्या पैशांसंदर्भात बोलणे देखील झाले. त्यानंतर दोन तासांतच त्यांना त्रास जाणवू लागल्याने त्यांना रुग्णालयात नेण्यात आले, परंत्तू रुग्णालयात दाखल पोहोचण्यापूर्वीच त्यांचा हृदय विकाराने मृत्यू झाला.
Visit : Bahujannama.com
- ‘हे’ १० पदार्थ आहेत अतिशय उपयुक्त, शरीरातील निकोटीन होईल ‘फ्लश आऊट’! –
- उपवास करणे फायद्याचे, पण या लोकांनी करू नये, अन्यथा होईल नुकसान ! –
- ‘वर्कआऊट’नंतर मांसपेशीत वेदना होतात का ? ‘हे’ प्रभावी उपाय करून पहा –
- तुमचा रंग सावळा आहे का ? याचे आरोग्यदायी फायदे जाणून व्हाल थक्क ! –
- मुलींनी मुलांसारखे कपडे परिधान केल्यास होऊ शकतो गर्भधारणेवर परिणाम ? –
- संक्रमणापासून बचावासाठी करा; या विटॅमिनचा वापर, जाणून घ्या –
- चांगल्या आरोग्यासाठी शरीराला दररोज किती कॅलरीजची असते आवश्यकता –
- वजन कमी करण्याचा ‘हा’ आहे खास ‘जपानी फार्मुला’! जाणून घ्या –