नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय खगोल शास्त्रज्ञांनी एक आश्चर्यकारक माहिती दिली आहे. भारतीय शास्त्रज्ञांनी एका विशाल ब्लॅक होलमधून मोठ्या प्रमाणात प्रकाश दिसत असल्याचा दावा केला आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार, या ब्लॅक होलचे नाव बीएल लॅकेर्टे ठेवण्यात आले आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने शनिवारी ही माहिती दिली.
यासाठी शास्त्रज्ञ झाले हैराण
भारतीय शास्त्रज्ञांच्या या दाव्यावर आश्चर्य यासाठी वाटत आहे कारण असे समजले जाते की, ब्लॅक होलमध्ये खगोलीय उल्का पडू शकते परंतु बाहेर येऊ शकत नाही. यास ब्लॅक होल नाव देण्यामागे हाच हेतू आहे की, हे आपल्यावर पडणारा प्रकाश सुद्धा शोषून घेते. म्हणजे ब्लॅक होल प्रकाशाला सुद्धा आपल्यात समावून घेते. काहीही परावर्तीत करत नाही. पीटीआयच्या रिपोर्टनुसार या शोधामुळे ब्रह्मांडाच्या उत्पत्तीचे रहस्य उलघडण्यास मदत होईल.
ब्रह्मांडाची उत्पत्ती समजण्यास होईल मदत
रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, हे संशोधन खुप महत्वपूर्ण आहे. याच्या विश्लेषणातून ब्लॅक होलची द्रव्यता आणि उत्सर्जनाच्या स्त्रोताची माहिती घेण्यास मदत मिळेल. इतकेच नव्हे हे संशोधन ब्रह्मांडाच्या उत्पत्तीच्या विविध टप्प्यांचे रहस्य उलघडण्यात आणि विविध घटनांचा शोध घेण्यात उपयोगी ठरू शकते. देशाच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने आपल्या अधिकृत वक्तव्यात म्हटले आहे की, बीएल लॅकेर्टे एक कोटी प्रकाश वर्ष दूर आहे.
बीएल लॅकेर्टेचा प्रमुख 50 ब्लॅक होलमध्ये समावेश
या ब्लॅक होलचा सर्वाधिक प्रमुख 50 ब्लॅक होलमध्ये समावेश आहे. हे त्या तीन ते चार ब्लॅक होलमध्ये सहभागी आहे ज्याबाबत खगोलशास्त्रज्ञांच्या एका अंतरराष्ट्रीय गटाने आगीच्या ज्वालांमधून निघणार्या प्रकाशाचा अंदाज वर्तवला होता. भारतीय शास्त्रज्ञांच्या एका गटाने 16 जानेवारी 2021 ला आगीच्या ज्वालांमधून निघणार्या या प्रकाशाचा शोध लावला आहे.