कोलकाता वृत्तसंस्था – पश्चिम बंगालमधील ममता सरकार कोणत्यानकोणत्या कारणांनी चर्चेत असते नुकतेच डॉक्टरांच्या संपामुळे चर्चेत आले होते ममता बॅनर्जी यांनी विरोधी पक्षांवर हल्ला चढविताना बंगाली कार्ड उघडले आहे. त्या म्हणाल्या कि “जर बंगालमध्ये राहायचे असेल तर बंगाली बोलता आलीच पाहिजे,” तसेच अशा गुन्हेगारांना राज्यात थारा देणार नाही, असेही ममता म्हणाल्या.
काही दिवसांपासून कोलकातामध्ये डॉक्टरांचा संप सुरु आहे. डॉक्टरांवर हल्ला झाल्याच्या पार्श्वभुमीवर देशभरातील डॉक्टरांनी संप पुकारला आहे. यावरून ममता बॅनर्जी लक्ष्य झाल्या आहेत गेल्या काही दिवसांपासून यामुळे ममता यांनी भाषिक मुद्दा उपस्थित करत बंगालला गुजरात बनू देणार नसल्याचे सांगितले.
उत्तर परगना जिल्ह्यातील तृणमूल काँग्रेसच्या मेळाव्याला संबोधित करताना ममता बोलत होत्या ,त्या म्हणाल्या कि,आपण बंगाली भाषेला प्राधान्य दिले पाहिजे जेव्हा पंजाब ,बिहार ,आणि उत्तरप्रदेशमध्ये जाते तेव्हा तेथील स्थानिक भाषा बोलते. जर तुम्ही पश्चिम बंगालमध्ये राहत असाल तर तुम्हाला बंगाली भाषा आलीच पाहिजे. जी लोक बंगालमध्ये राहतात आणि बाईकवर इकडे तिकडे फिरतात अशा गुन्हेगारांना राज्यात थारा देणार नाही.बंगालमध्ये सुरु असलेल्या डॉक्टरांच्या संपावर ममता बोलल्या त्या म्हणाल्या कि, डॉक्टरांना भाजपा आणि सीपीएम भडकवत असून या प्रकरणाला वेगळे वळण देण्याचे काम करत आहे.