नाशिक : बहुजननामा ऑनलाईन – काळाराम मंदिर सत्याग्रहाच्या ८८ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून रामदास आठवले यांनी २ मार्चला नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणावर शक्ती प्रदर्शन केले. त्यांच्या सभेला नाशिक करांनी उदंड प्रतिसाद दिला. काळाराम मंदीर प्रवेश सत्याग्रहींना अभिवादन करण्याच्या निमित्ताने ही अभिवादन सभा गोल्फ क्लबच्या ईदगाह मैदानावर आयोजीत करण्यात आली होती.
या अभिवादन सभेला केंद्रीय समाजकल्यान राज्यमंत्री रामदास आठवले. सीमाताई आठवले, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले. जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन. ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे.माजी पालकमंत्री छगन भुजबळ. पशु संवर्धन मंत्री महादेवराव जानकर. कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत. आमदार विनायक मेटे यांच्यासह विविध महामंडळाचे अध्यक्ष या सभेस उपस्थीत होते.
राज्यात वंचित बहुजन आघाडीला मोट्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असताना. नाशिककरांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या ( ए ) काळाराम मंदीर प्रवेश सत्याग्रहींना अभिवादन सभेला प्रचंड गर्दी केली होती.आरपीआय (ए ) चे जिल्हाप्रमुख प्रकाश लोंढे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.