नाशिक : बहुजननामा ऑनलाईन – महाराष्ट्र शासनाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार २०१८-१९ शासनाच्या वतीने क्रांतीकुमारजी हकचंद जैन. महेंद्रजी दगडू कांबळे. सुनीलजी बन्सी मोरे, अनिल सयाजी लोखंडे यांना घोषित करण्यात आला. सामाजिक न्याय विभागाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार शनिवार, दि.२ मार्च २०१९ रोजी महाकवी कालिदास कलामंदिर येथे सायंकाळी ५:०० वाजता हा राज्यस्तरीय पुरस्कार मान्यवरांना देण्यात येणार आहे.
या पुरस्कार वितरण सोहळ्यास केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री मा.श्री.रामदास आठवले, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री मा.डॉ.सुभाष भामरे, व नाशिकचे पालकमंत्री तथा वैद्यकिय शिक्षण, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री मा.श्री.गिरीष महाजन यांची प्रमुख उपस्थिती लाभली आहे. तर कार्यक्रमांच्या अध्यक्षस्थानी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री मा.श्री.राजकुमार बडोले हे असणार आहेत. यावेळी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य राज्यमंत्री मा.श्री.दिलीप कांबळे, ग्रामविकास राज्यमंत्री मा.श्री.दादाजी भुसे, नाशिकच्या महापौर मा.सौ.रंजना भानसी, जिल्हा परिषद अध्यक्षा मा.सौ.शितल सांगळे आदी मान्यवरांची उपस्थितीत होती.
या पुरस्कार वितरण सोहळयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार-८८ व्यक्ती व १० संस्थाना, शाहू- फुले – आंबेडकर पुरस्कार- २४ संस्थांना व संत रविदास पुरस्कार – ११ व्यक्ती १ संस्थांना यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.