बहुजननामा ऑनलाइन टीम – ग्रामीण भागातील जनतेच्या सोयीसाठी तालुकास्तरावर शिबिरांचे आयोजन करण्यात आलं आहे. त्या अनुषंगाने नव्या वर्षासाठी (156 camps in the new year)वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. वाहनचालक परवान्यासाठी नागरिकांना नाशिकला चकरा माराव्या लागतात. ही वेळ त्यांच्यावर येऊ नये यासाठी नाशिकच्या प्रादेशिक परिवहन विभागाच्या कार्यालयातर्फे नव्या वर्षात १५६ शिबिरे घेण्यात येणार आहेत.
दरम्यान, कोरोना साथीच्या आजारामुळे काही महिने तालुकास्तरावर होणारे शिबिर काही काळासाठी स्थगित करण्यात आली होती. त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेची वाहनचालक परवान्याची कामे खोळंबली होती. परिणामी, होणारी गर्दी लक्षात घेऊन तालुक्याच्या ठिकाणी प्रत्येक महिन्यातून दोनदा शिबिराचे आयोजन करण्यात आलं आहे. वाहन परवान्यासंदर्भातील कामे वेगाने होणार असल्याने नागरिकांना दिलासा मिळणार आहे. शिबिर दौऱ्यात शिकाऊ व पक्क्या अनुज्ञपतीचे कामकाज करण्यात येणार आहे.
नागरिकांनी आपले अनुज्ञप्तीची कामे शिबिर कार्यक्रमात करून घ्यावीत, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनय आहिरे, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमंत हेमाडे यांनी केले आहे. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या व तिसऱ्या आठवड्यात पिंपळगावला, सिन्नर, येवला व निफाडला, तर दुसऱ्या व तिसऱ्या आठवड्यात घोटी, लासलगाव, दिंडोरीत आणि चौथ्या आठवड्यात चांदवड, त्र्यंबकेश्वर, सुरगाण्यात शिबिरे आयोजित केली जाणार आहेत.
आयोजित शिबिरे
जानेवारी २०२१ : पिंपळगाव (४, १८ जानेवारी) सिन्नर (५, २०), येवला (७, २२), निफाड (८), घोटी (११), लासलगाव (१३), दिंडोरी (१५), चांदवड (२५), त्र्यंबकेश्वर (२७), सुरगाणा (२९).
फेब्रुवारी २०२१ : पिंपळगाव (२, १६ फेब्रुवारी), सिन्नर (४, १८), येवला (५, २२), निफाड (८), घोटी (१०), लासलगाव (१२), वणी (१५), चांदवड (२३), त्र्यंबकेश्वर (२५), सुरगाणा (२६).
मार्च २०२१ : पिंपळगाव (२, १७ मार्च), सिन्नर (४, १९), येवला (५, २२) निफाड (८), घोटी (१०), लासलगाव (१२), दिंडोरी (१५), चांदवड (२४), त्र्यंबकेश्वर (२६), सुरगाणा (३०).
एप्रिल २०२१ : पिंपळगाव (१, १६ एप्रिल), सिन्नर (५, १९) येवला (६, २२), निफाड (७), घोटी (९), लासलगाव (१२), वणी (१५), चांदवड (२६), त्र्यंबकेश्वर (२८), सुरगाणा (३०).
मे २०२१ : पिंपळगाव (३, १७ मे), सिन्नर (४, १९), येवला (६, २१), निफाड (७), घोटी (१०), लासलगाव (१२), दिंडोरी (१३), चांदवड (२४), त्र्यंबकेश्वर (२७), सुरगाण (२८).