Nashik Crime | फक्त 6 हजार रूपयांच्या कारणावरून 22 वर्षीय तरूणीनं उचललं ‘हे’ पाऊल

 Nashik Crime | 22 year old girl commits suicide due to lost of 6 thousands
नाशिक :  बहुजननामा ऑनलाइन – Nashik Crime | नाशिकमधील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका 22 वर्षीय युवतीने थेट टोकाचं पाऊल उचललं (Nashik Crime) आहे. संबधित युवतीने अगदी छोट्या कारणासाठी वसतिगृहाच्या खोलीत गळफास (Suicide in Nashik) घेऊन आपलं जीवन संपवलं आहे. आई-वडिलांनी क्लासच्या फीसाठी दिलेले पैसे हरवले म्हणून तिने आत्महत्या केली. तिने घेतलेल्या टोकाच्या निर्णयाने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

याबाबत माहिती अशी की, श्रुती सानप (Shruti Sanap) असं आत्महत्या केलेल्या युवतीचे नाव आहे. श्रुतीने अशाप्रकारे टोकाचा निर्णय घ्यायला नको होता, अशी प्रतिक्रिया परिसरातील नागरिक आणि तिच्या महाविद्यालयातील शिक्षक वर्गातून व्यक्त होते आहे. मुळची बीडची (Beed) असणारी श्रुती नाशिकच्या सप्तश्रृंगी आयुर्वेद महाविद्यालयात शिक्षण घेत होती. ती महाविद्यालयाला लागून असलेल्या वसतिगृहात राहत होती. श्रुती ही 2 दिवसांपूर्वी आपल्या मूळगावावरुन परत आली होती. क्लासच्या फीसाठी तिने आईवडीलांकडून 6 हजार रुपये आणले होते. पण, प्रवासादरम्यान तिच्याकडून पैसे हरविलेले होते. त्यामुळे ती मानसिक तणावात होती. त्यातूनच तिने आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलीसांकडून वर्तवला आहे. (Nashik Crime)

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

दरम्यान, श्रुतीने तिच्या राहत्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केली आहे. याप्रकरणी पंचवटी पोलिसांत (Panchavati Police Station) मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेमुळे शैक्षणिक वर्तुळात आणि नाशिक शहरातही हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहे.

 

 

 

Web Title :- Nashik Crime | 22 year old girl commits suicide due to lost of 6 thousands

 

 

Pune Congress | पुणे शहर महिला कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी पूजा मनिष आनंद तर प्रदेश उपाध्यक्षपदी संगीता तिवारी यांची नियुक्ती

 

Multibagger Stock | ‘या’ मल्टीबॅगर स्टॉकने 12 वर्षात 1 लाख रुपयांचे केले 3.37 कोटी; एक नजर टाकूयात 1.63 रुपयांपासून 550 रुपयांपर्यंतच्या या प्रवासावर

 

Gold Silver Price Today | खूशखबर ! वर्षाच्या अखेरीस सोने-चांदी स्वस्त; जाणून घ्या आजचा भाव