Pune Crime | अनैतिक संबंधाच्या कारणावरुन पुण्यात एकाची ‘गेम’ ! महिलेसह दोघे ‘गोत्यात’

Pune Crime | The 59-year-old husband's suspicions on the character of his 51-year-old wife ended with murder; Incidents in Junnar taluka of Pune
पुणे : बहुजननामा ऑनलाइन – अनैतिक संबंधाच्या (Immoral Relations In Pune) कारणावरून दोघांनी केलेल्या मरहाणीत एकाचा मृत्यू (Murder in Pune) झाल्याची घटना पुण्यातील (Pune Crime) हडपसर (Hadapsar News) परिसरात घडली आहे. याप्रकरणी वानवडी पोलिसांनी (Wanwadi Police Station) एका महिलेसह दोघांवर खुनाचा गुन्हा (FIR) दाखल केला आहे. ही घटना पुण्यातील (Pune Crime) महंमदवाडी येथील काळेपडळ कडे जाणाऱ्या रोडवर गुरुवारी (दि.30) दुपारी साडेचारच्या सुमारास घडली आहे.

 

ताजुद्दीन हबीब पठाण Tajuddin Habib Pathan (वय-53 रा. एकता कॉलनी, प्रगती शाळेजवळ, काळेपडळ, हडपसर) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर 32 वर्षीय महिलेसह राज पाटील या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सिद्दीक कासीम शेख (वय-31 रा. आंबेडकर नगर, देहुरोड) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात (Wanwadi Police Station) शुक्रवारी (दि.31) फिर्याद दिली आहे. (Pune Crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत ताजुद्दीन पठाण हे बांधकाम व्यावसायिक (Builder) आहेत. त्यांच्या कामावर काम करणारी महिला आणि त्यांच्यामध्ये अनैतिक संबंध होते. मयताचे अनैतिक संबंध असल्याचे समजल्यानंतर त्यांची पत्नी आणि मुलगा मागील आठ महिन्यांपासून वेगळे राहत होते. शुक्रवारी दुपारी साडेचारच्या सुमारास आरोपी महिला आणि तिचा नातेवाईक यांनी मयत ताजुद्दीन यांना बेदम मारहाण केली.

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

आरोपी महिलेने ताजुद्दीन यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. तर तिचा नातेवाईक राज पाटील याने स्टंपने मारहाण केली. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने ताजुद्दीन यांना ससून रुग्णालयात (Sassoon Hospital) उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप आरोपींना अटक करण्यात आलेली नाही. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक शेंडगे (API Shendge) करीत आहेत.

 

 

Web Title :- Pune Crime | murder in wanwadi police station area due to immoral relations

 

 

Nashik Crime | फक्त 6 हजार रूपयांच्या कारणावरून 22 वर्षीय तरूणीनं उचललं ‘हे’ पाऊल

 

Coronavirus in Maharashtra | राज्यात ‘कोरोना’चा विस्फोट ! वर्षाच्या शेवटच्या दिवशी राज्यात 8067 नवीन रुग्ण; जाणून घ्या इतर आकडेवारी

 

Temperature in Maharashtra | उत्तरेकडील थंड वाऱ्यांमुळे महाराष्ट्रातील अनेक भागात किमान तापमानात घट