मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – Gold Silver Price Today | भारतीय सराफा बाजारात आणि आतंरराष्ट्रीय सराफा बाजारात सोन्या-चांदीचे दर (Gold Silver Price Today) उतरताना दिसत आहे. यामुळे वर्षाच्या अखेरही सोने-चांदी स्वस्त झाल्याचं पाहायला मिळत आहे. मागील काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली आहे. आज (शुक्रवारी) 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव (Gold Price) 46,750 रुपये पर्यंत आहे. तर, चांदीची किंमत 62,200 रुपये प्रति किलोपर्यंत पोहचली आहे.
मागील दोन महिन्यापासून सोन्याच्या किंमतीत घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. ऐन सणातही सोन्याचा दर स्वस्त होता. त्यामुळे सोनं खरेदी करण्यासाठी ग्राहकांची गर्दी झाली होती. दरम्यान, गतवर्षीच्या तुलनेत यंदा सोन्याचा भाव हा स्वस्त आहे. त्यामुळे सोन्यात गुंतवणूक करण्यासाठी ग्राहकांना योग्य संधी आहे. गेल्यावर्षी सोन्याचा दर 50 हजाराच्या वर होता. यंदा सोन्याचा भाव 50 हजाराच्या आत आहे. तर, आंतरराष्ट्रीय मौल्यवान धातूच्या किंमती आणि रुपयाच्या घसरणीमध्ये सुधारणा होत असतानाच वर्षाच्या शेवटी सोने-चांदीचे दर कमी झाले आहे. (Gold Silver Price Today)
दरम्यान, सामान्यपणे 22 कॅरेट सोन्याचा वापर दागिने बनवण्यासाठी केला जातो. ज्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. जर तुम्ही 22 कॅरेट सोन्याचे दागिने घेत असाल तर तुम्हाला हे माहित असले पाहिजे की 22 कॅरेट सोन्यामध्ये 2 कॅरेट इतर धातू मिसळले गेले आहेत. तर, सामान्य सोन्याचे दर आणि हॉलमार्क केलेल्या सोन्याच्या दरामध्ये कोणताही फरक नाही. तुम्हाला हॉलमार्क सोन्यासाठी कोणीही अतिरिक्त शुल्क घेत नाही. सामान्य सोने ज्या दराने विकले जाते तोच दर हॉलमार्क केलेल्या सोन्याचा असतो.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
आजचा सोन्याचा भाव – (Gold Price)
पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,040 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 48,560 रुपये
नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,750 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 48,750 रुपये
मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,750 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 48,750 रुपये
आजचा चांदीचा भाव – 62,200 रुपये (प्रति किलो).
Web Title :- Gold Silver Price Today | gold silver rate in india today on 31 december 2021