नांदेड : बहुजननामा ऑनलाईन – Nanded Crime | शहरातील गाडीपुरा भागात मंगळवारी रात्री गँगवॉरमधून कुख्यात गुंडाची निर्घृण हत्या (Murder of Criminal) करण्यात आल्याची घटना (Nanded Crime) समोर आली आहे. विक्की ठाकूर (criminal vicky thakur) असं या गुंडाच नाव असून दोन दुचाकींवर आलेल्या दुसऱ्या टोळीतील गुंडांनी ठाकूरचा पाठलाग करत त्याच्यावर गोळीबार (Firing) केला. त्यानंतर त्याच्यावर तलवारीने सपासप वार केले. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
कुख्यात गुंड विक्की चव्हाण (Criminal Vicky Chavan) याचा विक्की ठाकूर (Criminal Vicky Thakur) हा साथीदार होता. विक्की नुकताच तुरुंगातून जामिनावर सुटला होता. मंगळवारी रात्री तो आपल्या घराजवळ थांबला असता दोन दुचाकीवरून आलेल्या पाच जणांनी त्याच्यावर गोळीबार केला. मात्र विक्कीने यातून स्वतःचा बचाव करत तेथून पळून गेला. परंतु हल्लेखोरांनी त्याचा पाठलाग केला. त्याच्यावर तीन गोळ्या झाडल्या. तसेच गोळीबारानंतर त्याच्या शरीरावर तलवारीने अनेक वार केले, यात विक्की ठाकूर हा जागीच ठार झाला. हल्लेखोरांनी हवेत गोळीबार करून पसार झाले.
वर्षभरापूर्वी विक्की चव्हाण याचा कैलास बिगानिया नामक गुंडाने खून केला होता.
बिगानिया गॅंगनेच आता चव्हाण याचा साथीदार विक्की ठाकूरचा खून केल्याचा पोलिसांना संशय आहे.
घटनास्थळी वरिष्ठ पोलिस अधिकार्यांनी भेट दिली आहे.
कुख्यात गुंडाचा तलवारीने वार करून खून झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.
गुन्ह्याचा अधिक तपास पोलिस करीत आहेत.
Web Title :- Nanded Crime | gang war in nanded goon vicky thakur killed by opposite gang
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Earthquake | काही तासात देशात 5 ठिकाणी भुकंपाचे धक्के; बिकानेर, मेघालय तीव्र धक्क्याने हादरला