नागपूर बहुजननामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसमध्ये राजकीय नेत्यांचे राजीनामा सत्र सुरु झाले होते. त्यात आता ऑल इंडिया काँग्रेस कमिटीच्या अनुसूचित जाती विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. नितीन राऊत यांनी सोमवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी हा राजीनामा काँग्रेसचे पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे पाठविला आहे.
काही दिवसांपूर्वी लोकसभा निवडणुकीत अपयश आल्याचे कारणावरून अपयशाचे श्रेय स्वत:कडे घेत त्यांनी हा राजीनामा देत असल्याचे सांगितले आहे. लोकसभेत आपण कमी पडल्याचे नमूद केले आहे. आपली टीम निवडणुकांपूर्वी सहा महिने अगोदर परिश्रम घेत होती मात्र त्यांच्या या प्रयत्नांना अपयश आले त्यामुळे आपण पदाचा राजीनामा देत आहोत असे म्हटले आहे. देशभरातून काँग्रेस पदाधिकारी राजीनामे देत आहेत, त्यात आता नितीन राऊत यांची भर पडली आहे.